Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाशिवरात्रीला उपवासाच्या ताटात शेंगदाणा महागला तर साबुदाणा, भगर झाली स्वस्त..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 25 February 2025, 11:22

शिरूर : महाशिवरात्रीचा उपवास करून भक्तीभावाने यात्रा जत्रांचा उत्सवाने सर्वत्र रंगत चढणार आहे. या दिवशी उपवास करताना खवय्यांची उपवासाची प्लेट विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांनी सजणार आहे. यंदा शेंगदाणा महागला असला तरी साबुदाणा आणि भगर स्वस्त झाल्याने महाशिवरात्रीच्या उपवासाला खवय्यांना चविष्ट पदार्थांची मेजवाणी ठरणार आहे.

 

शिरूर तालुक्यात गावागावात श्री महादेव मंदिरांच्या ठिकाणी यात्रा उत्सवाला रंगत चढलेली असते. काही ठिकाणी अंखड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भजन, किर्तन, हरिजागर केला जातो. या वेळी सामुहिक साबुदाणा खिचडीचा कार्यक्रमाचे नियोजन असते. त्यामुळे आलेल्या भाविकांना दर्शनाची सुविधा तसेच उपवासाची खिचडी देण्याचे नियोजन संयोजकांकडून करण्यात येते. यंदा महाशिवरात्रीचा उपवास करताना खवय्यांची उपवासाची प्लेट विविध प्रकारच्या पदार्थांनी सजणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक बाजारात साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे ३ ते ४ हजार रूपयांनी घट झालेली आहे. शेंगदाण्याच्या दरात ३ हजार रूपयांनी वाढ झालेली आहे. महाशिवरात्रीला अनेक जण भक्तिभावाने उपवास करतात. उपवासासाठी विविध खाद्य पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक असणारा साबुदाणा, भगर, आणी शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी विचारात घेऊन व्यापारी साबुदाणा, शेंगदाणा, भगर, खरेदी करतात. मागणीत वाढ झाल्याने शेंगदाणे महागले आहेत. मात्र साबुदाणा आणी भगरीचे दर कमी झाले आहेत. मागील वर्षी साबुदाणा ८५ रुपये किलो होता. तो आता ६० रूपयांवर आला आहे. भगर १२५ रूपये प्रती किलोवरून १०० रूपये प्रती किलोवर आली आहे. त्यामुळे उपवासाचे पदार्थ आवडणाऱ्या खवय्यांना महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे.

किरकोळ बाजारात किलोचा दर

  • शेंगदाणा : १०० ते ११० रूपये प्रतिकिलो
  • भगर : १०० ते ११० रूपये प्रतिकिलो
  • साबुदाणा : ६० ते ७० रूपये प्रतिकिलो

नाशिक भागातून भगर, तामिळनाडूतुन साबुदाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश गुजरातमधून शेंगदाणाची आवक होत असते. या काळात शेंगदाण्याची मागणी वाढत असल्याने त्याचे भाव वाढतात. भगरीला तृणधान्य घोषित केल्याने भगरीच्या मागणित वाढ झाली आहे. बाजारात भगर व साबुदाण्याची आवक चांगली असल्याचे व्यापारी बाळासाहेब फिरोदिया यांनी सांगितले.

 

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

duaghter murdered her mother with help of friend pune

Pune Crime : दारूच्या वादातून मजुराचा दगडाने ठेचून खून, कोंढवा पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Saturday, 2 May 2026, 13:53
two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40
Next Post

ग्राहकांना दिलासा ; सोन्याचे भाव घसरले, चांदीची किंमत महागली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.