पुणे : सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेड वाढताना दिसत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींत वाढत होत्या. मात्र आता दरवाढीच्या उच्चांकानंतर सोने स्वस्त झाले असून चांदीची किंमत महागली आहे.मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६,४०० रुपयांवर पोहोचला आहे.दुसरीकडे, चांदीचा भाव प्रति किलो ९६,११५ रुपयांवर आला आहे. सोने स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति १० ग्रॅम)
1. मुंबई ८०,७५० रुपये
2.पुणे ८०,७५० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति 10 ग्रॅम )
1. मुंबई ८८,०९० रुपये
2. पुणे ८८,०९० रुपये
दरम्यान सोन्याच्या वायदा किंमती १६ रुपयांनी घसरून ८५,९९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या. एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे करार ०.०२ टक्क्यांनी घसरले आणि १६,१७६ लॉटचा व्यवहार झाला आहे . सोने स्वस्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.






