Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निलेश वाळूंज यांनी उपोषण सोडले; मुख्य अभियंत्यांकडून सर्व मागण्यांची होणार पूर्तता…

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 14 June 2025, 9:48

शिरूर : सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आंदोलनस्थळी येऊन सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच त्यासंदर्भात वाळूंज यांना लेखी पत्र देखील दिले आहे. त्यामुळे निलेश वाळूंज यांनी शुक्रवारी (ता.१३) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधातील सत्याग्रह आणि अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते मलठण या रस्त्याच्या आणि याच रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट कामाच्या सखोल चौकशी बरोबरच तालुक्याच्या इतर भागातील रस्त्यांच्या दूरवस्थेकडे व निकृष्ट कामांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरूर शहरातील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये २ जून पासून सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते. तसेच प्रशासकीय स्तरावर वाळूंज यांच्या आंदोलनाबाबत सकारात्मक तोडगा निघाला नसल्यामुळे वाळूंज यांनी ९ जून पासून अन्नत्याग आंदोलनही सुरू केले होते. शुक्रवारी सत्याग्रह आंदोलनाचा १२ वा दिवस होता. तसेच अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस होता.

याच दरम्यान,शुक्रवारी(ता.१३) सायंकाळी सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आंदोलनस्थळी येऊन सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यासंदर्भात वाळूंज यांना लेखी पत्र दिले आहे. त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलक समर्थक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सहाय्यक अभियंता अनिल जाधव, उपविभागीय अभियंता सूर्यकांत कुंभार, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्याकडून लेखी पत्र स्वीकारून आंदोलन थांबवले आहे.

मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी निलेश वाळुंज यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या असून, प्रामुख्याने आमदाबाद ते मलठण या रस्त्यावरील कोंढाण पुलाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. तसेच रामलिंग ते अण्णापूर या रस्त्याच्या कामाचा दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचा अहवाल जनतेसमोर सादर करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्य अभियंता चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे.

याप्रसंगी माजी नरसेवक विठ्ठल पवार, शिवसेनेचे गणेश जामदार, डॉ.संतोष शिंदे,माजी सरपंच प्रकाश थोरात, माऊली पवार, माजी सरपंच दत्तात्रय कुरुंदळे,माजी उपसरपंच लक्ष्मण कुरुंदळे,बजरंग दलाचे विशाल शिंदे,महेश कुरुंदळे, किरण कुरंदळे, मोहन पवार, भाऊ रासकर, दादाभाऊ कुरुंदळे, शरद कुरंदळे, सचिन रासकर, प्रताप दसगुडे, सोमनाथ भगत, मंदा वाळूंज, सुनीता वाखारे, कल्पना पुंडे, सीमा गिरमकर इत्यादी मान्यवर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

दिवे घाटात ढगफुटी; धबधब्यांनी धारण केलं रौद्र रुप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp