Saturday, May 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येत्या सोमवारी लक्ष्मी रस्त्यावरून फक्त पादचारी प्रवास करणार… वाहनांना प्रवेश बंद! ‘हे’ आहे कारण…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 8 December 2023, 17:41

पुणे : महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जातो. यंदा पादचारी दिनानिमित्त पुणे महापालिकेने एक अनोखा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी आठ या कालावधीत (ता. ११) लक्ष्मी रस्ता वाहनविरहित ठेवण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी लक्षमी रस्ता बंद असेल.

पादचारी दिन साजरा करणारे पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे. पुण्यात पादचारी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. वाहतूक पोलीस, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना आणि पथारी संघटनेच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी महामेट्रोकडून डेक्कन मेट्रो स्थानक ते महापालिका भवन स्थानक या दरम्यान सायकली उपलब्ध करून देण्यात येणार असून, पीएमपीकडून ज्यादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

 

या उपक्रमामुळे नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौकादरम्यान पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौक आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांत पदपथांची देखभाल-दुरुस्ती करून पादचाऱ्यांना पदपथावरून विनाअडथळा चालता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. शहरातील शंभर महत्त्वाच्या चौकांत पादचारी सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या जात आहेत.

विशेष म्हणजे या दिवशी सामान्य नागरिकांनाही कला सादर करण्याची संधी मिळणार असून ‘वॉकिंग प्लाझा’चे व्यासपीठ त्यांच्यासाठी खुले राहणार आहे. लक्ष्मी रस्त्याला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने या रस्त्याला नवे रूप येणार असून, यादिवशी खासगी गाड्यांचा वापर करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाहतूक बदलाची नोंद घेण्याचे आवाहन
लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक ते गरुड गणपती मंडळ दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लिंबराज महाराज चौकातून (सेवासदन चौक) टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सेवासदन चौकातून उजवीकडे वळावे. तेथून बाजीराव रस्त्यावरून इच्छितस्थळी जावे. कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी चितळे बंधू मिठाईवाले दुकानाजवळून डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. रमणबाग चौकातून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मी रस्त्याकडे न जाता. केळकर रस्त्याने टिळक चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News : विषारी दारूमुळे एकूण 16 बळीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 9 पोलीस तडकाफडकी निलंबित ; सख्ख्या भावांसह 12 जणांचा फुगेवाडीत अंत, आणखी 5 जणांची प्रकृती गंभीर..

Saturday, 30 May 2026, 10:18

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

Friday, 29 May 2026, 20:56

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 29 May 2026, 20:19

“जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!” म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

Friday, 29 May 2026, 20:00

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Friday, 29 May 2026, 18:55

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

Friday, 29 May 2026, 18:36
Next Post
Theft in Yellamma Devi Temple Pandharpur Solapur

यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह 10 लाखांच्या दागिन्यांवर चोरांचा डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.