Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घटस्फोट न घेताच पती थाटणार दुसरा संसार; एकमेकांशी पटत नसल्यामुळे पती-पत्नीचा अजब करारनामा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 8 June 2025, 19:02

पुणे: पती-पत्नी परस्पर संमतीने घटस्फोट घेताना अटी-शर्ती घालतात, हे सर्वसामान्य आहे. मात्र, घटस्फोट न घेता फक्त करारनाम्यावर वेगळे राहण्याचा निर्णय घेणारे दांपत्य पाहायला मिळणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे, ज्यात दोघांनी वेगळं राहण्याचा करार केला असून, पतीने दुसऱ्या विवाहासाठी मुली पाहायला सुरुवात देखील केली आहे.

या दांपत्याचा विवाह २०२१ साली झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. नातेवाइक आणि कुटुंबीयांनी समेट करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांना हे नातं टिकवता येणार नाही, याची खात्री पटली. २०२२ पासून पत्नी माहेरी राहायला गेली आणि दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी त्यांनी कायदेशीर घटस्फोट न घेता फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर एक करारनामा केला.

या करारनाम्यातील अटी अत्यंत अजब आणि गंभीर आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, दोघे एकमेकांविरोधात कोणतीही मागणी करणार नाहीत, एकमेकांशी पती-पत्नी म्हणून कोणतेही हक्क सांगणार नाहीत आणि दोघेही वेगळ्या जोडीदारासोबत घरोबा करण्यास मोकळे असतील. याशिवाय, कायदेशीर घटस्फोट न्यायालयातून घेण्यात येईल असेही नमूद आहे.

काय आहे कायदेशीर बाजू?

 

अशा करारनाम्याला कोणतेही कायदेशीर स्थान नाही, असे वकिलांचे स्पष्ट मत आहे. हिंदू विवाह कायदा, 1955 नुसार, पती-पत्नीमधील वैध विवाह केवळ कौटुंबिक किंवा जिल्हा न्यायालयाच्या आदेशानेच समाप्त करता येतो. केवळ करार करून विभक्त होणे, यामुळे वैध घटस्फोट मानला जात नाही.

अँड. रेणू सोनावणे (नोटरी व मध्यस्थ) म्हणतात, “शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर केलेला करार कायदेशीर घटस्फोट ठरत नाही. अशा कृतीमुळे दैविवाह, फसवणूक व फौजदारी गुन्हे घडू शकतात.”

भारतीय दंड संहिता कलम 494 नुसार, वैध घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यास त्यास बिगॅमी (द्वैविवाह) मानले जाते. यासाठी ७ वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. तसेच, जर व्यक्तीने पूर्वीचा विवाह लपवून दुसरे लग्न केले, तर ते कलम 415 आणि 417 अंतर्गत फसवणूक मानले जाते, आणि त्यावर फौजदारी खटला देखील चालवता येतो.

नोटरीचं प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता

सरला मुदगल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, पहिला विवाह वैध असतानाच दुसरा विवाह धर्मांतर करून केला, तरी तो बेकायदेशीर ठरतो. अशा प्रकारच्या करारनाम्यावर सही करणाऱ्या नोटरीचे प्रमाणपत्र देखील रद्द होऊ शकते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38
Next Post

थायरॉईडची लक्षणं तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp