अमित मुंडीक

पुणे: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार असून, यामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. फडणवीस म्हणाले की, ९ किमी लांब व २३ मीटर रुंद असलेला देशातील सर्वात लांब बोगदा व १८५ मीटर उंच पूल हा प्रकल्पात बांधला जात असून, हे दोन्ही विक्रम ठरणार आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल. यामुळे घाटमाथ्यावरील वाहतूक अडथळे, अपघात कमी होणार असून इंधन बचत व प्रदूषणही घटेल. सुमारे ९४% काम पूर्ण झाले असून लवकरच प्रकल्प पूर्णत्वास जाईल.







