Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कात्रजमध्ये पानटपरीवरील वादातून तरुणाचा खून; आरोपीला कोयत्यासह अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 12 July 2025, 20:08

पुणे : कात्रज परिसरातील साई सिध्दी चौकात शुक्रवारी (११ जुलै) रात्री पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून २५ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, नाशिक) असे असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक, कात्रज) असे आहे.

घटनेचा तपशील :
आर्यन साळवे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचा रहिवासी असून, तो अलीकडे आपल्या मामाकडे धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहण्यासाठी आला होता. तो कात्रजमधील एका केशकर्तनालयात नोकरी करत होता.

 

शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास आर्यन साई सिध्दी चौकातील एका पानटपरीवर पान खाण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी धैर्यशील मोरे पानटपरीवर सिगारेट ओढत होता. धैर्यशीलने आर्यनकडे संशयित नजरेने पाहिल्याने त्यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की, धैर्यशीलने अचानक आर्यनवर कोयत्याने वार केला.

आर्यनने बचाव करण्याचा प्रयत्न करताना हातावर वार झेलला, त्यामुळे त्याची बोटे तुटली. त्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यावर घातक वार केला. या गंभीर जखमेमुळे आर्यन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पोलीस कारवाई :
घटनेनंतर तत्काळ कारवाई करत भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरेला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नसरापूर हादरवणाऱ्या प्रकरणात आरोपी दोषी; नराधमाला फाशी होणार कि जन्मठेप? जाणून घ्या

Thursday, 25 June 2026, 12:36

पुणे–दौंड रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार? उपनगरीय दर्जा व अतिरिक्त MEMU–DEMU फेऱ्यांची राहुल कुल यांची मागणी

Thursday, 25 June 2026, 12:16

केतन अग्रवाल हत्याकांड! लेकीच्या गुन्हेगारी कृत्याने सिया गोयलच्या वडिलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Thursday, 25 June 2026, 12:00

विश्वराज हॉस्पिटलची मोठी कामगिरी; शस्त्रक्रियेशिवाय TAVR तंत्रज्ञानाने 75 वर्षीय वृद्धाच्या हृदयाची बदलली झडप, रुग्णाला दिले नवे आयुष्य

Thursday, 25 June 2026, 11:47

पाटसमध्ये जमिनीच्या वादातून पुतण्यावर काका अन् नातवाचा कोयत्याने हल्ला

Thursday, 25 June 2026, 11:46

‘मानसिक छळ, कमी पगार आणि कामाचा वाढता ताण’ होत असल्याची लिहिली सुसाईड नोट, फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्थेच्या खुले निवारागृहातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Thursday, 25 June 2026, 11:23
Next Post

संकट काळात खंबीरपणे काम करणारा नेता म्हणजे मुरलीधर मोहोळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.