Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडीत नसलेले बांधकाम झाल्याचे दाखवून तब्बल २५ कोटींचा अपहार; खोट्या सह्या करून बॅंक मॅनेजरने मंजूर केले कर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 25 January 2024, 17:58

पुणे : हिंजवडी येथील ७१ गुंठे मोकळ्या जागेवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या बॅंकेकडे कर्जाची मागणी केली होती. कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी पिंपरी शाखेच्या बॅंके मॅनेजरकडे कागदपत्रे जमा करण्यात आली. या कागदपत्रांचा खोटा वापर करुन या जागेवर बांधकाम झालेले नसतानाही बांधकाम झाल्याचे कागदोपत्री दाखवून आणि खोट्या सह्या करुन परस्पर २५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन मॅनेजरनेच पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

या प्रकरणी गौरव सोमानी (वय ३४, शोभा सवेर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय रायकर, महेश भगवानराव नलावडे, मंदाकिनी महेश नलावडे, शहाबाज जाफर यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते २०२४ या दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमानी यांची साई प्लॅटेनियम व्हेंचर या नावाने संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून हिंजवडी येथील ७१ गुंठे मोकळ्या जागेवर बांधकाम प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज घेयचे होते. त्यासाठी फिर्यादी यांनी त्यांचे ओळखीतील एसबीआय बॅंकेच्या पिंपरी शाखेतील मॅनेजर आणि आरोपी शहाबाज जाफर यांची भेट घेतली.

दरम्यान, कर्ज प्रकरण मंजूर करु असे आरोपी जाफर यांनी सोमानी यांनी सांगितले आणि त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे असलेली फाईल स्वत: कडे ठेवली. त्यावर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन आणि फिर्यादी यांची कोणतीही परवानगी न घेता २५ कोटी रुपये कर्ज मंजूर केले. तसेच आरोपी मॅनेजर शहाबाज याने त्याच्या ओळखीचे बांधकाम व्यवसायिक आणि आरोपी विजय रायकर यांच्या खात्यात ६.५ कोटी तर मंदाकिनी नलावडे यांच्या खात्यात ६.५ कोटी असे एकूण १३ कोटी रुपये रक्कम जमा करुन ते पैसे लाटले. त्यातील एकही रुपये सोमानी यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने सोमानी पुन्हा बॅंकेत फिरकले नाहीत. मात्र लॉकडाऊन संपताचा सोमानी यांना बॅंकेने १० .४४ कोटी रुपये कर्ज थकबाकी थकल्याची नोटीस पाठवली. मात्र कर्ज घेतलेच नाही तर कर्ज थकले कसे असा प्रश्न उपस्थित करुन सोमानी यांनी बँकेशी संपर्क साधला.

दरम्यान, बॅंकेने शहाबाज यांची अंर्तगत चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरी सोमानी यांना सातत्याने कर्ज थकबाकी प्रकरणी नोटीसा येत होत्या. या त्रासाला कंटाळून सोमानी यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींनी मिळून फिर्यादी यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जाफर यांच्यावर या आधीही फसवणूक केल्याप्रकरणी बॅंक व्यवस्थापनाकडून यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली होती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post
Ajit Pawar called meeting of 34 villages tax and other civic issues in pune

महाराष्ट्र वन विभागाच्या कॅलेंडरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचे चुकीचे नाव, विकास लवांडे यांनी ट्विट केला फोटो

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.