Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे नवरदेवाचा मंगल कार्यालयाच्या चालकावर कट्यारीने हल्ला ; ६ जणांवर गुन्हा दाखल..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 9 January 2024, 11:59

उरुळी कांचन, (पुणे) : किरकोळ कारणावरून नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी नवरदेवासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नवरदेवासह पाच ते सहा नातेवाईकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरदेव अभिजीत राजू मिरगणे, राहुल रमेश सरोदे, दत्ता यांच्यासह पाच ते सहा नातेवाईकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करण दीपक सणस (वय २७, रा. उरूळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील उरूळी कांचन परिसरात दीपक सणस यांचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. विवाह समारंभानंतर वर अभिजीत मिरगणे आणि नातेवाईक रात्री साडेआठच्या सुमारास स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकवण्यास सांगितले.

या कारणावरुन अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर अभिजीतने त्याच्याकडील कट्यारीने वार केला. कट्यारीला धार नसल्याने गंभीर दुखापत झाली नाही.

 

दरम्यान, अभिजीत आणि मित्रांनी मंगल कार्यालयात गोंधळ घालून शिवीगाळ केली. याप्रकरणी सणस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार  लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार रमेश गायकवाड पुढील तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50
Next Post
Inside story of sahil polekar in shard mohol murder case pune

दोस्तीत कुस्ती करणारा 20 वर्षाचा मुन्ना पोळेकर कोण? कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणातील मुन्नाची इनसाईड स्टोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp