Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदारला संपवलं! सूड उगवण्यासाठी वर्षभर वाट पहिली अन् संधी मिळताच काटा काढला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 15:39

पुणे : कात्रजमधील शुभम चव्हाण याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ अक्षय चव्हाण याने मंदार मारुती किवळे (वय ३६) याची शिवाजीनगर न्यायालयाबाहेर हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी दिवसाढवळ्या न्यायालयाच्या परिसरात पाच ते सात जणांनी मंदारवर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्याचा कट शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचल्याचा संशय असून, अक्षय चव्हाण हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याची माहिती आहे.

२० एप्रिल २०२५ रोजी कात्रज येथील संतोषनगर परिसरात जमिनीच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण याची हत्या झाली होती. शुभमच्या घराशेजारील जमिनीवरून त्याचा अमर दिलीप साकोरे (वय ४०) याच्याशी वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी मध्यरात्री शुभम संतोषनगर परिसरातून जात असताना अमर साकोरे, मंदार किवळे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला अडवून शिवीगाळ व मारहाण केली.

हल्लेखोरांच्या तावडीतून सुटण्यासाठी शुभमने पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले. लाकडी बांबू आणि स्टंपने मारहाण केल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी अमर साकोरे, मंदार किवळे, गिरीश सुभाष बाबरे आणि योगेश बाबुराव ढोरे या चौघांना अटक केली होती. पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने कामठी बुद्रुक येथे छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले होते.

शुभम चव्हाण हत्या प्रकरणात मंदार किवळे याला चार दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. खटल्याशी संबंधित कामासाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असताना हल्लेखोरांनी त्याला गाठले. त्याच्यावर आधी गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या हत्येमागे शुभम चव्हाणच्या खुनाचा बदला घेण्याचा हेतू असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण हा या हल्ल्यातील प्रमुख आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षयने १२ ते १५ जणांना सुपारी दिल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांची ओळख पटवली असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. न्यायालय परिसरात झालेल्या या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली असून, हल्ल्याचा कट, त्यातील सहभागी आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मांजरीत किरकोळ वादातून थेट गोळीबार! गुन्हेगारांच्या मित्रत्वाचा रक्तरंजित शेवट? जखमी आणि गोळीबार करणारा आरोपी रफुचक्कर

Wednesday, 25 November 2026, 15:50

पुण्यात भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदारला संपवलं! सूड उगवण्यासाठी वर्षभर वाट पहिली अन् संधी मिळताच काटा काढला

Wednesday, 25 November 2026, 15:39

व्यावसायिकाचा पाठलाग करत गाडी अडवली, काचा फोडून गळा चिरला! किरकोळ वादातून कोल्हापूर-सांगली सीमेवर रक्तरंजित थरार…

Wednesday, 25 November 2026, 15:25

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! गोड बोलून जाळ्यात ओढलं अन् तिघांकडून ११ कोटी ६७ लाख उकळून पसार; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 25 November 2026, 15:08

पुणे हादरलं! भरदिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार; जामिनावर सुटलेल्या तरुणाचे हात तोडले, कोयत्याने २० वार, पहा Video….

Wednesday, 25 November 2026, 14:42

पुण्यात बँक अधिकाऱ्यांनीच केली फसवणूक! वसुली अधिकाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ व्यक्तीचे १७ लाख रुपये लाटले

Wednesday, 25 November 2026, 14:31
Next Post

मांजरीत किरकोळ वादातून थेट गोळीबार! गुन्हेगारांच्या मित्रत्वाचा रक्तरंजित शेवट? जखमी आणि गोळीबार करणारा आरोपी रफुचक्कर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp