पिंपरी : गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची तब्बल दोन कोटी २२ लाख ३७ हजार ११५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी (दि.१२) वाकड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नवनीज हिरालाल पाटील (वय ३०), विनोद उत्तमराव पाटील (वय ३५) आणि सुनील गंगाधर पाटील (वय ३६, सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झोल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नायगाव (ता. वसई, जि. पालघर) येथील ४२ वर्षीय नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ डिसेंबर २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधीतील वाकडमधील अर्थप्लस इनव्हेस्टमेंट यांच्या कार्यालयात घडली. आरोपींनी यांनी आपसांत संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरूवातीला काही दिवस परतावा दिला. त्यानंतर काहीच परतावा न देता गुंतवणुकीची रक्कमही स्वतःकडे ठेवत एकूण दोन कोटी २२ लाख ३७ हजार ११५ रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.