Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikalbhor : लोणी स्टेशनजवळ महामार्गावर ऑइल सांडल्याने दुचाकीस्वारांचे घसरून अपघात; वाहतूक काही काळ ठप्प

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 March 2026, 12:06
Lonikalbhor

PHOTo- ai

lonikalbhor : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऑइल सांडल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आणि एकामागोमाग अनेक दुचाकी घसरून अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसतील हाडके पेट्रोल पंपासमोर बुधवारी (ता. 18) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनातून मोठ्या प्रमाणात तेल रस्त्यावर सांडल्याने महामार्गाचा एक भाग अक्षरशः घसरडा झाला होता. याची कल्पना नसलेल्या दुचाकीस्वारांचे वाहन अचानक घसरून अनेक जण रस्त्यावर पडले. अपघातांमध्ये काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अनेक दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही वाहनांचे हेडलाईट, इंडिकेटर आणि बॉडीचे भाग तुटल्याचे दिसून आले.

 

नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास

घटनेनंतर काही काळ त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा लागला. रस्त्यावर तेलाचा थर पसरल्याने अनेक वाहनचालकांनी गाड्या थांबवून परिस्थितीचा अंदाज घेतला. काहींनी तर दुचाकी हाताने ढकलत सुरक्षित अंतर पार केले.

वाहतूक कोंडी, प्रशासनाला उशिरा माहिती

अपघातांच्या मालिकेमुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडीही झाली होती. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाला व पोलिसांना माहिती दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. रस्त्यावर वाळू टाकून घसरडेपणा कमी करण्याचे काम करण्यात आले.

जबाबदार कोण? नागरिकांचा संताप

महामार्गासारख्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर तेल सांडूनही त्याची तात्काळ दखल न घेतल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे मोठा अपघात होऊ शकला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित वाहनचालक किंवा कंपनीचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या धोकादायक परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post

Pune Crime : पोलिसांनी थांबवलं, झडती घेतली आणि समोर आलं भयानक वास्तव; 24 वर्षांच्या तरुणाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.