Loni Kalbhor : लोणी काळभोर, ता. 24 : थेऊर (ता. हवेली) येथे प्रेम विवाहाचा वाद विकोपाला गेला आहे. प्रेमविवाह केल्याच्या वादातून एकावर धारदार शस्त्र डोक्यात मारुन खून करण्याचा प्रयत्न तर दोघांना दगड व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता.22) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी तर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्यातील 6 आरोपींना अवघ्या 12 तासाच्या अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. Loni Kalbhor

रोशन दिलीप चव्हाण, दिलीप पंडीत चव्हाण, आईनाबाई दिलीप चव्हाण, पुजा शेखर चव्हाण, मनिषा दादा शितोळे, उज्वला बाळु सावंत (सर्व रा. चव्हाणवस्ती, थेऊर, ता. हवेली) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अरुण छबु चव्हाण, (वय-४०) व त्यांची मुले अर्जुन व पुनम (सर्व रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली जि. पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण चव्हाण यांचा मुलगा राहुल व आईनाबाई चव्हाण यांची नात साक्षी यांचा प्रेमविवाह झाला आहे. या प्रेमविवाहामुळे दोन्ही कुटुंबामध्ये नेहमी वादविवाद होत होते. Loni Kalbhor अरुण चव्हाण हे घरातील दुध संपल्याने दूध विकत घेण्याकरीता शनिवारी चालले होते. तेव्हा याच विवाहाचा वादातून आईनाबाई चव्हाण यांनी फिर्यादी अरुण चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा अरुण चव्हाण हे आईनाबाई चव्हाण यांना समजावित असताना त्यांनी फिर्यादी यांना कानाखाली मारुन गचुंडी पकडली.
त्यानंतर आईनाबाई चव्हाण यांनी आरडाओरड करून मुलगा शेखर चव्हाण, रोशन चव्हाण, नातु राज शितोळे पती दिलीप चव्हाण, मुलगी उज्वला सावंत, मनिषा शितोळे, सुन पुजा चव्हाण यांना बोलावुन बेकायदाशिर जमाव गोळा केला. शेखर याने अरुण चव्हाण यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारला. Loni Kalbhor आईनाबाई हिचा नातु राज शितोळे याने त्याच्या हातामधील धारदार शस्त्र अरुण चव्हाण यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. आणि आज याला जिवतचं सोडत नाही आज याचा कार्यक्रम करून टाकतो असे म्हणून धमकी दिली.
आईनाबाई यांचे पती दिलीप, मुलगा रोशन यांनी त्यांच्याकडील लाकडी दांडक्यानी अरुण चव्हाण यांना मारहाण केली. तर आईनाबाई यांची सुन पूजा शेखर चव्हाण, मुलगी मनिषा शितोळे व उज्वला बाबु सावंत यांनी घराचे बाहेर रस्त्यावर पडलेले दगड उचलुन अरुण चव्हाण यांच्या पाठीवर, पोटावर, हाता पायावर मारहाण केली. Loni Kalbhor तर भांडणे सोडविण्यासाठी अरुण चव्हाण यांची मुले अर्जुन व पुनम हे मध्यस्ती करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांनादेखील शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.
दरम्यान, या मारहाणीत अरुण छबु चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 7 आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कायदा २०२३ चे कलम १०९ (१), ११८ (२), १८९ (२). १८९ (४), १८९ (१), ११५ (२) आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट पोलीस अॅक्ट ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी 6 आरोपींना अवघ्या 12 तासाच्या आत अटक केली आहे. Loni Kalbhor
सहाही आरोपींना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी राज दादा शितोळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पूजा माळी पोलीस हवालदार दिगंबर जगताप, गणेश सातपुते, विजय जाधव, अमोल जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







