Loni kalbhor : कायम वेळ पाळणाऱ्या अजित दादांची नियतीने वेळ चुकवली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न येणारी असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी केले.

उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथे सर्व राजकीय पक्षांच्या वतीने शुक्रवारी (ता. 30) सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशांत काळभोर बोलत होते. (Loni kalbhor)

यावेळी राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, ज्येष्ठ नेते व साधना बँकेचे संचालक सुभाष आप्पा काळभोर, भाजपाचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रविण काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, माजी सरपंच राहुल काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, युवराज काळभोर, आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, कमलेश काळभोर, रमेश भोसले, संतोष भोसले, शितल कांबळे, रेश्मा काळभोर, अमोल टेकाळे, आदि सर्वपक्षीय मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर म्हणाले, ” उरुळी कांचन व लोणी काळभोर या ठिकाणी अजित दादांच्या दोन सभा आपल्या परिसरात घेण्याचे नियोजन सुरु होते. मात्र चर्चा असतानाच हि घटना समजली. त्यामुळे अतिशय दुख झाले. अजित दादांचे पूर्व हवेलीतील सर्वच नागरिकांवर प्रेम होते. अजित दादांचे स्मारक करावे अशी इच्छा आहे. सुख व दुखात सहभागी असलेला असा नेता पुन्हा होणे नाही.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पूर्व हवेली भागातील राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते हेलावले होते. सनी काळभोर, सुभाष काळभोर, नागेश काळभोर यांच्यासह अनेकांनी स्व. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांना दुःख अनावर झाले. असा नेते पुन्हा होणे नाही, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त करीत आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, गावातील व शहरातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन गरजू, गरीब आणि वंचित घटकांसाठी त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. विकासकामे, सामाजिक उपक्रम, आपत्तीच्या काळातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. पसायदानाने या शोकसभेची सांगता करण्यात आली.







