Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँकेतील मॅनेजरची नोकरी सोडून हातात धरली एसटीची स्टीअरिंग ; पुण्यातील महिला एसटी चालक शीतल शिंदे यांचा यशस्वी प्रेरणादायी प्रवास…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 February 2023, 11:35

पुणे : पुण्यातील महिला एसटी चालक शीतल शिंदे यांनी बँकेतील मॅनेजरची नोकरी सोडून हातात एसटीची स्टीअरिंग धरली आहे. नागरिकांमध्ये मिसळण्याची आणि प्रवासाचीदेखील आवड असल्याने शीतल शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. पूर्वी बँकेतील व्यवस्थापक ते आता एसटीच्या चालक ही नवी संधी मिळाली आहे. ही संधी नोकरीच्या पलीकडची असून, महिला चालक ही नवी ओळखच माझ्यासाठी चांगली आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील शीतल शिंदे यांचे मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशनपर्यंत शिक्षण झाले आहे. त्या ॲक्सिस बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होत्या. बँकेत नोकरी करत असतानाच महिला चालकांच्या एसटीच्या भरतीची जाहिरात पाहिली. त्या निवड परीक्षेत पास झाले आणि बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर प्रशिक्षण २०१९ पासून सुरू झाले आहे.

कोरोना काळात या प्रशिक्षणाला स्थगिती मिळाली होती. मात्र, आता प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. महामार्ग, घाट अशा विविध प्रकारच्या मार्गांवर बस चालविली. अगदी यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबादपर्यंतही फेरी झाली असल्याने आता आत्मविश्वास वाढला आहे. सुरुवातीला हे नक्कीच आव्हानात्मक होते.  मात्र, पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. याचा अभिमान आणि कौतुक वाटते. यामध्ये कुटुंबाचाही पाठिंबा मिळाला. याबाबत विशेषतः महिलांच्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या. ही थाप अधिक प्रोत्साहन देणारी आहे, असे शीतल शिंदे यांनी सांगितले आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे महिला चालकांचा महामंडळात समावेश झाला. यामध्ये पुणे विभागातील सहा जणींचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला चालक सहभागी झाल्या आहेत. त्यामधीलच एक महिला एसटी चालक शीतल शिंदे आहेत.

याबाबत बोलताना शीतल शिंदे म्हणाल्या कि, एसटीच्या विविध मार्गांवर जाणाऱ्या महिला वाहकांना स्वच्छतागृहाची समस्या भेडसावते. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात ही समस्या अधिकच जाणवते. मार्गांवर स्वच्छतागृह नसल्याने अनेकदा गैरसोय होते. त्यामुळे महिला चालकांसाठी स्वच्छ स्वच्छतागृह आणि सुस्थितीतील विश्रांतीगृह उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

भरधाव कारचालकाने शिवाजीनगर-पुणे विद्यापीठ रस्त्यावर सात वाहनांना उडवले ; ४ जण जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.