Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडी येथील शेतात घुसून जेसीबीने उध्वस्त केली लाखोंची बाग; महिलांना धमक्या, लोणी कंद पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 21 May 2026, 19:05

लोणी काळभोर, ता. २१ : शेतजमिनीच्या वादातून शेतातील ऊस, सिताफळ बाग आणि इतर फळझाडांची दोन जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून महिलांना शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कोलवडी-साष्टे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. २१) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी दिपाली किरण साळुंके (रा. साळुंके वस्ती, कोलवडी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित मोडक (रा. हडपसर) व त्याच्यासोबत असलेल्या सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपाली साळुंके व त्यांच्या जाऊबाई शेतात खुरपणीचे काम करत असताना अचानक दोन जेसीबी आणि सात ते आठ जणांचा समूह शेतात दाखल झाला. या गटासोबत रोहित मोडक हाही उपस्थित होता.

 

आरोपींनी कोणतीही पूर्वसूचना अथवा परवानगी न घेता गट क्रमांक ५४ मधील सुमारे ६० गुंठे ऊस शेती जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. महिलांनी विरोध केला असता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण ऊस पीक उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी शेजारील सुमारे २०० सिताफळ झाडांची बागही जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकली.

याचवेळी शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था, पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, वीज कनेक्शन तसेच शेतातील नावाच्या पाट्यांची तोडफोड करण्यात आली. एवढेच नव्हे, तर ३० आंब्याची झाडे, १० नारळाची झाडे आणि ४ सागाची झाडेही नुकसानग्रस्त झाली आहेत.

या घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रज्ञा साळुंके यांच्या हातातील मोबाईल आरोपींनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादींचा मुलगा अथर्व साळुंके व भाचा साहिल जगताप यांचा पाठलाग करून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. काही महिलांनी दगड हातात घेऊन अंगावर धाव घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संबंधित आरोपी पसार झाले.याप्रकरणी दिपाली साळुंके यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार रोहित शिवाजी मोडक व त्याच्यासोबत असलेल्या अन्य अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 329(3), 189(2), 189(6), 324, 351(2) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15

‘तर मी एका मिनिटांत राजीनामा देईन’ दिलीप वळसे पाटलांचे थेट आव्हान; दूध भेसळ प्रकरणावरून राजकारणात खळबळ!

Sunday, 2 August 2026, 18:46

भाटघर धरण 100% भरले! 45 स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 2 August 2026, 18:32

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

Sunday, 2 August 2026, 18:10
Next Post

RoyalsTiger Casino – De quelle manière contacter le service clientèle au Canada

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.