Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Namdev Jadhav: नामदेव जाधव यांच्यावर शाई फेक, राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली जबाबदारी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 18 November 2023, 21:50
Ink thrown on namdev jadhav in pune

पुणे : प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांना पुण्यात काळं फासल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळ फासलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाधव यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. “आम्ही आजच्या या आंदोलनाची जबादारी स्वीकारतो. होय, आम्ही नामदेवराव जाधव यांना काळं फासलं. या नामदेव जाधवांना विक्रोळी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. एका शाळेत पैसे देऊन मुलांचे मार्क्स वाढल्याप्रकरणी त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. आणि आज ते शरद पवार यांच्यावर टीका करतायत”, असं प्रशांत जगताप म्हणाले.

“लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. पण तो खऱ्या पुराव्यांवर आधारित असावा. खासदार शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात 60 वर्षांपासून अधिक काळ आहेत. त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जातात. हे आरोप होत असताना त्यांच्याकडून पुरावे सादर केले जात नव्हते. पुरावे असतील, तर निश्चित टीका करावी. आम्ही जाधव यांना आठ दिवसांचा कालावधी दिला होता. आम्ही त्यांना इशारा देऊनही ती भाषा थांबवली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं”, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.

नामदेव जाधव यांची हल्ल्यानंतर प्रतिक्रिया

नामदेव जाधव यांनी संबंधित घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवारच असल्याचे कागदपत्रे माझ्या हाती लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राग आला. आमचा आज कार्यक्रम होता. तो कार्यक्रम या लोकांनी उधळून लावला. त्यानंतर मी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी माझ्याविरोधात हल्ला केला आहे”, अशी प्रतिक्रिया नामदेव जाधव यांनी दिली. ते पुढे म्हणले, “मी असं समजतो की, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं नाव घेणाऱ्या गुंडांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आज खून केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभरात जाऊ नयेत, यासाठी त्यांनी माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे हा लोकशाहीवर हल्ला आहे”, असं देखील नामदेव जाधव म्हणाले.

 

“याप्रकरणी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मी मागणी करतो. मी माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नव्हतो, तर मराठा समाजासाठी भांडत होतो. 5 कोटी मराठ्यांवरली हा हल्ला आहे, असं समजायला हरकत नाही. मी या प्रकरणात कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही. या प्रकरणात पहिलं नाव शरद पवार आणि दुसरं नाव रोहित पवार यांचं असणार आहे. त्यांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्यासाठी मी प्रचंड मोठं पाऊल उचलणार आहे”, असं नामदेव जाधव म्हणाले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
one year child saved by Fire Brigade in pune

Pune News: लोखंडी जाळीत अडकलेल्या चिमुकल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले प्राण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.