Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांच्या आदेशाला लोणी काळभोर येथील अवैध धंदेचालकांनी फासला हरताळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 May 2025, 18:37

लोणी काळभोर, ता. 8 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदभार सांभाळला आहे. कोणत्याही प्रकारच्या हप्तेखोरीला बांध फोडणार नसून राज्यातील सर्व हातभट्टी धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अजित दादांच्या स्वत:च्या जिल्ह्यातच अवैध धंदेवाल्यांनी त्यांच्या आदेशाला हरताळ फासला आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागील दोन महिन्यांपासून अवैध धंदे पुन्हा बोकाळले आहेत. रामदरा डोंगराच्या शेजारी असलेल्या वनविभागाच्या परिसरात अनेक हातभट्ट्या राजरोसपणे सुरु असून दिवसाकाठी सुमारे 5 लाख रुपयांची दारू तयार होत आहे. ही दारू कदमवाकवस्तीसह पुणे शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अड्ड्यांवर दिवसाढवळ्या पोहोच केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून हा अवैध धंद्याचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.

 

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. 1160 शेजारी असलेल्या वनविभागाच्या जागेत एक स्वयंघोषित ”दादा” खुलेआम हातभट्टी दारू तयार करत आहे. या हातभट्टीचा पोलिसांना ठावठिकाणा मिळत नव्हता. मात्र, एका खबऱ्याने या अड्ड्याचा छडा लावून ही जागा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस कारवाई करण्यासाठी दादाच्या हातभट्टीवर जात होते. मात्र, दादाला याची खबर अगोदरच मिळत असल्याने तो काही वेळातच गाशा गुंडाळून रफुचक्कर होत होता आणि पोलीस यंत्रणा रिकाम्या हाताने परतत होती.

लोणी काळभोर पोलिसांना मंगळवारी (ता.6) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदर ठिकाणी हातभट्टी दारू बनविण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर पोलिसांनी त्वरित एक पथक तयार करून त्याठिकाणी पाठविले. पोलिसांनी बुधवारी (ता.7) रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा दोघेजण पिकअप घेऊन पळून जाऊ लागले. या गोंधळामध्ये पिकअप गाडी पलटी झाली.

त्यानंतर पोलिसांनी पिकअपची झडती घेतली असता, त्यामध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व गुळ आढळून आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार तौसिफ रसुलभाई सय्यद यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 (5) सह, मुंबई प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत 48 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लुटुपुटुच्या खेळात ‘दादा’ला अभय

तू मारल्या सारखं कर.. मी रडल्या सारखं करतो.. या पद्धतीने लोणी काळभोर पोलीस व दादा यांच्यामध्ये लुटुपुटुचा खेळ सुरु आहे. या कारवाईमध्ये पोलिसांना ही हातभट्टी कोणाची आहे, हे माहिती असूनदेखील दादावर कारवाई केली जात नाही. तसेच या गुन्ह्यात वापरलेले वाहनही पुराव्यासाठी जप्त करणे महत्वाचे होते. मात्र, पोलिसांनी मेहरबानी दाखविल्याने दादाला अभय मिळाले आणि वाहनाला या गुन्ह्यातून क्लीन चीट मिळाली.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

संबंधित दादाला राजकीय वरदहस्त असल्याने तो अवैध धंद्याच्या माध्यमातून मोठी माया गोळा करत आहे. याच काळ्या मायेच्या जोरावर तो सर्व यंत्रणेला सोयीस्कररीत्या मॅनेज करत आहे. यामुळे त्याच्यावर पुढेही कारवाई होण्याची सुतरामही शक्यता नाही. पालकमंत्री अजित दादांनी अवैध दारू धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असतानादेखील, लोणी काळभोर परिसरातील अवैध हातभट्टी धंदे खुलेआम सुरु ठेवले आहेत. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांनी अजितदादा व पुणे शहर पोलिसांना खुले चॅलेंज दिले असल्याचे दिसून येत आहे. तर अवैध धंदेवाले व स्थानिक पोलिसांच्या या खेळाची लोणी काळभोर परिसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हातभट्टीवाला दादा व त्याचा गांजा तस्कर असलेला साथीदार या दोन गुन्हेगारांनी एका बोगस पत्रकाराला हाताशी धरून बनावट पेपरच्या (अधिकृत शासकीय मान्यता नसलेल्या) माध्यमातून माझी बदनामी केली आहे. याबाबत पुढील दोन दिवसांत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार आहे. अब्रूनुकसानीचा दावा ठोकून संबंधित दोन गुन्हेगार व बोगस पत्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून, या दोन गुन्हेगारांनी पत्रकारांच्या विरोधात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या सर्वांवर कडक कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे.

-जनार्दन दांडगे (मुख्य संपादक – पुणे प्राईम न्यूज)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Next Post

'हार्पी'च्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये कहर, संरक्षण यंत्रणा केली उद्ध्वस्त, जाणून घ्या घातक ड्रोनबद्दल सर्वकाही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.