Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमविवाहानंतर छळ! ‘दुसरे लग्न’? पत्नीची मारहाण, आर्थिक छळ केल्याप्रकरणी एकावर खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 July 2026, 18:26

पुणे, ता. १३ : सोशल मीडियावरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन झालेल्या विवाहानंतर पतीकडून मारहाण, पैशांसाठी छळ, दुर्लक्ष आणि दुसरे लग्न केल्याचा संशय व्यक्त करत एका विवाहितेने पतीविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय विवाहितेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता व अमर कांबळे यांची सन २०२२ मध्ये सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. त्यानंतर दोघांनी ५ जानेवारी २०२३ रोजी खराडी येथील साईबाबा मंदिरात प्रेमविवाह केला. सुरुवातीला संसार सुखाचा सुरू होता. मात्र २०२४ नंतर पतीच्या वागण्यात बदल झाला आणि किरकोळ कारणांवरून मारहाण व मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गर्भावस्थेदरम्यान पतीने त्यांची योग्य काळजी घेतली नाही. तसेच “आई-वडिलांकडून दोन ते तीन लाख रुपये आण” अशी मागणी करत वारंवार शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर पतीच्या मोबाईलवर “आपल्या लग्नाला आज एक महिना झाला” असा संदेश आढळल्याने संशय बळावला. त्यानंतर संबंधित महिलेशी संपर्क साधल्यानंतर पतीचे दुसऱ्या महिलेशी निकटचे संबंध असल्याची माहिती मिळाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पुढे सोशल मीडियावरून पती आणि संबंधित महिला एकत्र असल्याचे फोटो व व्हिडिओ मिळाल्याने संशय अधिकच वाढल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

 

याबाबत जाब विचारल्यानंतर पतीने उडवाउडवीची उत्तरे दिली, तर संबंधित महिलेने शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर अनेक वेळा समेटाचे आश्वासन देऊन पुन्हा मारहाण केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. लोहगाव पोलीस ठाण्याबाहेरही पतीने हाताने आणि हातातील कड्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीने आपल्या तक्रारीत पतीवर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला असून, त्याचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत संबंधित पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Thursday, 30 July 2026, 16:33

शरद पवारांनी चर्चा संपवली तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण सुरू! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा मोठा दावा

Thursday, 30 July 2026, 15:59

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! बारामतीतील राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Thursday, 30 July 2026, 15:27

घराबाहेर जातांना ‘ती’ एक चूक केली अन् घडलं भयंकर; घरी परतल्यावर पायाखालची जमीन सरकली….

Thursday, 30 July 2026, 15:07

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांना अखेर मोठा दिलासा! तब्बल २३ दिवसांनंतर घाटातील मुख्य जीवनवाहिनी पूर्णपणे पूर्ववत

Thursday, 30 July 2026, 15:00
Next Post

मुलगा हवा होता पण... सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; सतत पैश्यांची मागणी अन् बारश्याच्या दिवशीच घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.