Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडी सुटणार, कात्रज ते येरवडा भुयारी मार्गाबाबत अजित पवारांनी सांगितला प्लॅन..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 February 2025, 12:50

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘शहरात वाहतुकीचा प्रश्न बिकट होत असून, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी कात्रज ते येरवडा हा भुयारी मार्ग महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन मार्गिका करण्याचे नियोजन आहे.’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवानिमित्त अजित पवार यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन पुणेकरांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, ‘पुणे शहराचा विस्तार होत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला असून भुयारी मार्ग यावर उपाय आहे. तो करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांनादेखील या रस्त्याचा वापर करता यावा, यासाठी सुरुवातीला केवळ दोन ठिकाणी बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला जाणार होता. मात्र, आता यामध्ये वाढ करावी लागणार आहे.’ असेही अजित पवार यांनी सांगितले.

दैनंदिन कामांवर परिणाम नाही

‘भुयारी मार्ग तयार करताना अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने त्याचा शहरातील दैनंदिन कामांवर काहीही परिणाम होणार नाही. एका वेळी दोन्ही बाजूंनी काम सुरू करून हे काम मार्गी लावता येणार आहे. या रस्त्याचे काम कमी वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी चार ठिकाणांवरून कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी तीनपदरी मार्ग केले जाणार असून याच्या बाजूनेच मेट्रो प्रकल्पाचा चौथा मार्ग करता येईल का, याचादेखील अभ्यास करण्यात येत आहे.’ असे पवार म्हणाले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचा विस्तार अधिक होणार असून, २०५४ पर्यंत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक असेल. या दोन्ही शहरांतील नागरिकांच्या पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन या गरजा भागविण्यासाठी आतापासून नियोजन करावे लागणार आहे. मुळशी धरणातील पाणी पिण्यासाठी वापरण्यास मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे.’ असे पवार म्हणाले.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53

दौंडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांना अटक, गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:42

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23
Next Post

Pune Crime News : केडगावसह यवत येथील 10 मेडीकल दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; घटना सीसीसीटीव्हीमध्ये कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.