दौंड: भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण नऊ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

पुण्यातील दौंड व केडगाव या दोन स्थानकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे सदर रेल्वे स्थानकात आधुनिकीकरणसह चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत दौंड स्थानकाला 44 कोटी आणि केडगाव स्थानकाला 12 कोटी 50 लाख असा एकूण 56 कोटी 50लाख निधी दौंड तालुक्यातील दोन स्थानकांना मंजूर करण्यात आला आहे या निधीतून स्थानकावर प्रवाशांसाठी वेटिंग कक्ष, फूड कोर्टस, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स , एक्सलेटर्स,आणि डिजिटल सुविधा तसेच स्थानकाचे सौंदर्यकरण आणि शहराशी सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित होईल यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल अशा आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण ९ स्थानकांमध्ये बारामती (11कोटी 40 लाख), दौंड (44 कोटी), केडगाव (12 कोटी 50 लाख), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20 कोटी 40 लाख), देहू रोड (8कोटी 50लाख), तळेगाव (40 कोटी, 34 लाख), हडपसर (25 कोटी), उरुळी कांचन (13 कोटी) असे निधी मंजूर झाले आहेत.







