विशाल भालेराव

खडकवासला: खानापूर परिसरात मध्ये सतत वीजपुरवठा खंडित लाईट येत नसल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन आधिकाऱ्याना निवेदन दिले.

पावसाळा चालू असल्याने लाईट नसल्याने अनेक समस्याना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे .समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास तीव्र आंदोलन करणार आसल्याचा इशारा खानापूर ग्रामपंचातीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून सिंहगड परिसरातील वीज वारंवार खंडित होत असून, महावितरणचे अधिकारी नागरिकांना चुकीची माहिती व फोन उचलत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, यापुढे वीज पुरवठा सतत खंडित झाला तर दोन दिवसात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल.”
सर्व नागरीकांनी वीज वितरण कंपनीला व कर्मचार्यांना सहकार्य करावे. आपल्या सिंहगड परिसरातील सर्व गावाना दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत चालू होईल असे खानापूर महावितरण कार्यालयात शाखा अभियंता शिंदे यांनी आश्वासन दिले.







