उरुळी कांचन : विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी माजी सरपंच सूरज चौधरी व राजेश चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी व त्याचा सावकार मित्र राजेश चौधरी यांच्यावर बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी देत मानसिक छळ सायबर गुन्हे नियंत्रण कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्यानुसार आरोपी चौधरी यांनी अॅड. सुधीर शहा व अॅड. चेतन नागरे यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
दरम्यान, राजेश चौधरी हा 2023 पासून तक्रारदार महिलेला ओळखत होता. त्यांमध्ये प्रेमसंबंध होते. याप्रकरणात फिर्याद ही दोन वर्षांनंतर देण्यात आली आहे. याखेरीज सूरज याच्याबरोबर महिलेचे आर्थिक व्यवहार होते. तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीमध्ये तफावत असल्याचा युक्तिवाद अॅड. शहा आणि नागरे यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत दोघांना जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.







