Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“फरार” थेऊर मंडलाधिकाऱ्याच्या सहकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन लाचखोरीचा आणखी एक गुन्हा, लाचखोर व वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे मात्र वीस दिवसांपासून नॉटरिचेबल..

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 April 2024, 16:27
FIR registered against colleague of theur ex circle Jayshri Kawade pune

लोणी काळभोर (पुणे): थेऊर (ता. हवेली) मंडलाच्या निलंबित लाचखोर व वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या एका गुन्ह्यामुळे  मागील गेल्या वीस दिवसांपासून फरार असतानाच, सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी जयश्री कवडे यांच्या एका बगलबच्च्याने कवडे यांच्यासाठी एका प्रकरणात 80 हजार रुपयांची मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवारी) आणखी एक गुन्हा दाखल केल्याने महसूल विभागातच एकच खळबळ उडाली आहे.

 

विजय सुदाम नाईकनवरे (रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या जयश्री कवडे यांच्या सहकाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

दरम्यान वीस दिवसांपासून म्हणजेच १३ मार्चला सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी थेऊरच्या तत्कालीन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजय सुदाम नाईकनवरे याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले होते. या प्रकरणी कोलवडी परिसरातील एका शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री कवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात कवडे यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाली असली तरी, या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जयश्री कवडे मात्र मागील वीस दिवसांपासून फरार आहेत.

थेऊरच्या निलंबित मंडल अधिकारी जयश्री कवडे, लोणी काळभोरच्या तलाठी पद्मिनी मोरे यांच्यासह थेऊर मंडल  कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच तलाठी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल “पुणे प्राईम न्यूज”ने मागील सहा महिन्यांच्या  काळात अनेक वेळा केली होती. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांची पाठराखण करत होते. त्यामुळे एसीबीकडून झालेली ही कारवाई हिमनगाचे छोटेशे टोक असून त्याची व्याप्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. थेऊर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी तलाठी व सर्कल कार्यालयातील जुन्या खासगी लोकांची खांदेपालट करत बेकायदेशीरपणे लाच स्वीकारण्यासाठी खाजगी ‘शूटर’ ची नेमणूक केल्याची चर्चा होत होती. मात्र, आता त्यांच्या खाजगी शूटरवर पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने थेऊर मंडल अधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहेत.

दरम्यान वरील प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी कोलवडी (ता. हवेली) येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद व फेरफार मंजुर करण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकारी यांच्याकरीता खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे थेऊर मंडल अधिकारी यांच्याकरीता ऐंशी हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे विजय नाईकनवरे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वीस दिवसांच्या आत दुसरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

लोणी काळभोर तलाठी कार्यालय, थेऊर तलाठी कार्यालय व थेऊर मंडल अधिकारी कार्यालय यामधील चुकीच्या कारभाराचा “पंचनामा” व शेतकऱ्यांकडून लाच मागितलेला व्हिडिओ व ऑडीओ क्लिपचा पुरावा “पुणे प्राईम न्यूज”ने प्रशासनासह जनतेपुढे मांडलेला होता. तसेच त्याबाबत नागरिकांनी महसूलच्या वरिष्ठ कार्यालयासह एसीबीकडे अनेक तक्रारी दाखल केलेल्या होत्या. मात्र, कागदी घोडे नाचवण्यापुढे वरिष्ठ अधिकारी काहीही करत नसल्याने नागरिकांमध्ये महसूलच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : ‘अजित मल्टीस्टेट’ सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! कर्जदार, जामीनदार सोडून निरपराध शेतकऱ्याच्या घर-जमिनीवर चढवला २४ लाखांचा बोजा? लोणी काळभोर येथील धक्कादायक प्रकार

Thursday, 30 April 2026, 14:50

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22
Next Post

आजपासून महावितरणचा ग्राहकांना शॉक; इलेक्ट्रीसिटी बिल ७.५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.