Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 April 2026, 12:55

Purandar News पुणे, ता. 30 : बहुप्रतिक्षित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अखेर वेग आला असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा समोर आली आहे. राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी प्रति एकर १ कोटी ते १.५ कोटी रुपयांपर्यंत मोबदला देण्याची शक्यता व्यक्त होत असून, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक परिवर्तनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. Purandar News

 

सरकारच्या प्रस्तावित पॅकेजनुसार, शेतकऱ्यांना रेडीरेकनर दराच्या चारपट रोख भरपाईसोबतच १० टक्के विकसित जमीन परत दिली जाणार आहे. ‘लँड पूलिंग’ मॉडेलमुळे भविष्यात या जमिनींची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय एरोसिटी प्रकल्पात टीडीआरचा लाभ मिळणार असल्याने हे पॅकेज राज्यातील सर्वात आकर्षक मानले जात आहे. Purandar News

प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या मुलांना रोजगारात १०० टक्के प्राधान्य देण्याची हमीही शासनाने दिली आहे. विमानतळासोबत लॉजिस्टिक्स, हॉटेल, वाहतूक आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याने पुरंदर तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी उदाचीवाडी, एखतपूर, कुंभारवळण, खानवडी, मुंजवडी, पारगाव आणि वनपुरी या सात गावांतील सुमारे ३ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादनाचा खर्च आता सुमारे ६ हजार कोटींवर पोहोचला असून, सरकारची मोठी गुंतवणूक या प्रकल्पात दिसून येत आहे. Purandar News

दरम्यान, प्रस्तावित विमानतळ आणि रिंगरोडमुळे परिसरातील जमिनींचे दर झपाट्याने वाढले आहेत. शेतीप्रधान असलेला हा भाग आता औद्योगिक व व्यावसायिक विकासाच्या उंबरठ्यावर उभा असून, पुरंदर विमानतळ प्रकल्प हा संपूर्ण परिसराच्या आर्थिक बदलाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. Purandar News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:49
Next Post

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द - प्रताप सरनाईक यांचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.