Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारखान्यांची धुराडी बंद; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का?

गणेश सूळby गणेश सूळ
Sunday, 20 October 2024, 16:30

-गणेश सुळ

 

केडगाव : निसर्गाशी झगडता झगडता नाकी नाऊ आले असताना साखर कारखाने महिनाभर उशिरा चालु होणार असल्याने शेतकरी चांगलेच हतबल झालेत. ऑक्टोबर महिना सरत आला तरी कारखान्याची अद्याप धुराडी पेटली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आलेत.

महाराष्ट्रात उशिरा कारखाने सुरु होणार असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस टोळ्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात महिनाभर उशिरा कारखाने चालू होणार असल्याने परिसरातील कारखान्याकडे टोळीची यंत्रणा नक्कीच अपुरी पडणार. त्यामुळे ऊसाला तोड मिळविण्यासाठी कारखान्याकडच्या यंत्रणेकडे मनधरणी करावी लागणार?ऊसाला तोड मिळेल का नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दौंड तालुक्यातील राहु, पिंपळगाव, देलवडी, पारगाव, नानगाव, कानगाव, वाळकी अशा अनेक गावामधून नदीचे पाणी फिरल्याने या भागात ऊसाची लागण मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आडसाली ऊसाची लागण जास्त करण्यात आली आहे. ऊसाचे पिकही जोमात आले आहे. परतीच्या पावसामुळे ऊस उत्पादकांचे कबरंडे मोडले. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने ऊसाला तुरे येण्यास सुरुवात झाली. परंतु यंदा कारखाने उशीरा चालू होणार असल्याने ऊस वाळू लागले आहेत.

वजनात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. कारखाने सुरु न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. परंतु चालू हंगामात दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज, तसेच भिमा पाटस हे तालुक्यातील चारही कारखाने केव्हा चालु होतील व ऊस तोड केंव्हा मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

अवकाळी, महापूर या अस्मानी संकटाचा त्रास शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यातच कारखाने उशिरा सुरू होणार? ऊसाला दर काय मिळणार? या विषयांची संभ्रमावस्था आहे. काही वाहतूक दरांनी टोळ्या आणल्या व गुऱ्हाळ घरासाठी ऊस तोडू लागले आहे. परंतु गुळाला भाव कमी झाले असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी वर्गाची लूट होत आहे. कमी भावाने ऊस तोडू लागले आहेत. गहू व कांदा पिकासाठी शेतकरी कमी भावाने ऊस पीक तोडु लागले आहेत. या परिस्थितीचा विचार करता सामान्य शेतकऱ्यांना वाली कोण ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडण्यास सुरुवात झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी यासगळ्या समोर हतबल झालेत.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

अजित पवारांना पुन्हा धक्का; हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक सोडणार राष्ट्रवादीची साथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.