Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीत 2 लाख 30 हजारांची वीजचोरी उघडकीस; बाप-लेकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 September 2025, 16:37

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धुमाळ मळा परिसरात विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून 2 लाख 30 हजारांहून अधिक रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पथकाला यश आले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काशिनाथ शंकर भोंडवे व शिवराम काशिनाथ भोंडवे (दोघेही रा. गट नं-389, धुमाळमळा कुंजीरवाडी ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बापलेकांची नावे आहेत. याप्रकरणी दिप्ती अनिल पाटील (वय. 44, रास्तापेठ, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिप्ती पाटील या महावितरणच्या मुळशी विभागातील भरारी पथकात उप कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. वीज ग्राहकांच्या विद्युत संचाची तपासणी करून वीजचोरी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे.

दिप्ती पाटील त्यांच्या सहकारी सोनाली बावस्कर, वरिष्ठ तंत्रज शुकलाल जाधव यांचे भरारी पथक कुंजीरवाडी परिसरात विद्युत संचाची तपासणी करीत होते. तेव्हा काशिनाथ भोंडवे यांच्या मीटरचे सील तोडून छेडछाड केल्याचे आढळून आले. वीज मीटर उघडून पहिले असता, ग्राहकाने मीटरच्या सीटी सर्किटमध्ये रेझिस्टन्स बसवल्याचे आढळून आले.

दरम्यान, भोंडवे यांनी अनधिकृतपणे, अप्रामाणिकपणे स्वतःच्या आधिक फायद्यासाठी वीज मीटरमध्ये छेडछाड करून मागील 87 महिन्यात 13 हजार 26 युनिटची वीजचोरी केली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे 2 लाख 28 हजार 921 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच तडजोड देयक 6 हजार रुपये आज तागायत भरलेले नाही. याप्रकरणी दिप्ती पाटील यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03

Phursungi News: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी महिलेला घातला अडीज लाखांचा गंडा

Wednesday, 1 April 2026, 11:01
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पळसदेवमध्ये थेट घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 10:50

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

Wednesday, 1 April 2026, 10:40

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33
Next Post
Nhavare News: Body found in Bhima riverbed at Mandavgan Farata; Question mark on Shirur police investigation...?

Nhavare News: मांडवगण फराटा येथील भीमा नदीपात्रातील मृतदेह प्रकरण; शिरूर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह...?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.