Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंडमध्ये ‘देलवडी-नाथचीवाडी-खुटबाव’ रस्त्यावर जीवघेणे खड्डे; अपघातांचे सत्र वाढले, समस्या कधी सुटणार?

गणेश सूळby गणेश सूळ
Friday, 7 November 2025, 15:10
Daund News: Life-threatening potholes on 'Delavadi-Nathchiwadi-Khutbav' road in Daund; Accidents have increased; When will the problem be solved?

Pune Prime News

पुणे: दौंड तालुक्यातील देलवडी (Daund News) अन् नाथचीवाडी तसेच खुटबाव (Pune News) अशा दोन्ही गावांना जोडल्या जाणाऱ्या (वांझरवाडी ते इनामके वस्ती) रस्त्यावर धोकादायक खड्डे व दरम्यान काही ठिकाणी झालेल्या अर्धवट कामांमुळे प्रवास जीवघेणा बनला आहे. अपघातांचे सत्र वाढले आहे. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असून रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

रस्त्यावरून भीमा पाटस कारखाना, दौंड साखर कारखाना, ओंकार शुगर यवत कारखान्याच्या दिशेने या मार्गावरून जड वाहतूक सुरू असते. कंटेनर, गुऱ्हाळघरांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची संख्या मोठी आहे. दौंड तालुक्याच्या हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायती क्षेत्र असल्यामुळे दलदलयुक्त भाग जादा आहे. दलदलयुक्त भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

धोकादायक खड्ड्यांमुळे चार चाकी गाड्यांचा मेंटेनन्स वाढला. रात्रीच्या वेळी दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण जादा आहे. कोट्यवधींच्या विकास कामांचा बोलबाला तालुक्यात सुरू आहे परंतु अवघ्या 1000 ते 1500 फुटांच्या रस्त्याने लाखो रुपयांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे. अनेकदा किरकोळ अपघात सुद्धा झाले आहे. रस्त्याच्या कामाचा कुठेही दर्जा नाही. ऊस वाहतूक करणारी वाहने अनेकदा प्रवाशांच्या अंगावर उलटली असल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच संबधित रस्त्यावर कॅनॉल चारी साठी वापरलेले सिमेंट पाईप पूर्ण फुटले असल्याने फक्त मोटार सायकल जाईल इतकीच जागा शिल्लक आहे. त्यामुळे संबधित विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कुठलीही अनुचित घटना घडल्यास प्रशासकीय अधिकारी जागे होणार का? असा संतप्त सवाल प्रवासी व नागरिक करू लागले आहेत.

“या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. उंचवट्यामुळे अवजड वाहने प्रवासी व शेजारील घरांवर उलटल्याच्या घटना घडत आहेत. पावसाचे पाणी तुंबत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्काळ गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
-दादासो तनपुरे – स्थानीक नागरीक

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post
Parth Pawar Land Scam Case: Who is Sheetal Tejwani, the 'power of attorney' in the Parth Pawar land scam case? New 'exploit' of a family drowning in a debt of 100 crores

Parth Pawar Land Scam Case: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातली 'पॉवर ऑफ अटर्नी'वाली शीतल तेजवानी कोण? 100 कोटींच्या कर्जात बुडालेल्या कुटुंबाचा नवा 'कारनामा'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp