Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : मुळा-मुठेच्या पाणीपातळीत घट, पिकांना फटका; बाप्पांच्या कृपेने आनंदघन बरसेल, बळीराजाची अपेक्षा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 15:36

गणेश सुळ

Daund News : केडगाव : दौंड तालुक्यात मुळा-मुठा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पाण्याअभावी जिरायतीसह बागायती भागातील पिकांना मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या मुळा, मुठा तसेच भीमा नदीला या वर्षी एकदाही पूर न आल्याने, तालुक्यातील शेतकरी लांबलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल

पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाला कसरत करावी लागत आहे. विद्युत पंपातून शेतीसाठी पाणी खेचता यावे यासाठी शेतकरी पाइप नदीपात्रामध्ये लांबवताना दिसत आहेत. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्याचे पराकोटीचे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांना विद्युत पंप काढण्याची वेळ येते. यंदा विद्युत पंपाचे पाईप लांबाविण्याची वेळ आली आहे. (Daund News) ऐन पावसाळ्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. यात भर म्हणून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस धावपळ होत आहे. दौंड तालुक्यात या वर्षी १४,८२० हेक्टर उसाची लागवड झाल्याचे दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.

दौंडमध्ये दरवर्षी ५० लाख टन उसाचे उत्पादन होते. यावर्षी कमी पावसामुळे उत्पादन घटणार आहे. परंतु पाऊस न झाल्याने आतापासूनच या उभ्या ऊस पिकाला जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे. अगदी कमी वाढ झालेली उसाची पिके तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वच पिकांवर उन्नी या रोगाचा प्रादूर्भाव वाढत आहे. दरवर्षी दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे ऐन पावसाळ्यात बंद असतात. (Daund News) विजयादशमीच्या मुहूर्तावर ही गुऱ्हाळे सुरू होतात. यावर्षी पाऊसच नसल्याने खंड न पडता गुऱ्हाळे चालू आहेत. पाण्याअभावी शेतकरी आहे या परस्थितीमध्ये आपल्या उसाची तोडणी करत आहे.

 

पाऊस लांबल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या गाई सांभाळण्यासाठी चौफुला (ता. दौंड) येथील बोरमलनाथ गो शाळेला दिल्याची माहिती गो शाळेचे प्रमुख कैलास शेलार यांनी दिली. (Daund News) यापूर्वी भटक्या गायी गो शाळेत दाखल केल्या जायच्या. या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाई गो शाळेत दाखल होत असल्याने दुष्काळाचे विदारक चित्र ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.

पाण्याअभावी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने, दूध उत्पादन देखील घटले आहे. यामुळे शेतकरी व दूध संस्थांना मोठ्या आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. (Daund News) गणराया भक्तांची हाक नक्की ऐकेल. आनंदघन बरसेल अन् शेतकऱ्यांचे समाधान करेल, अशी अपेक्षा आहे, असे मत जय मल्हार दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष गणपत लव्हटे यांनी व्यक्त केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : ‘गणराया अवॉर्ड’ २०२३’मध्ये सहभागी होण्याचे, दौंडच्या जनसेवा प्रतिष्ठानचे आवाहन..

Daund News : दौंडमध्ये यंदाचा गणपतीबाप्पा पावणार कोणाला?; राज्यात सत्तांतर झाल्याने गणेशोत्सवाला विशेष महत्व

Daund News : देलवडी सेवा सोसायटीच्या वतीने १२ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

Pune News : कयानीचा मावा केक अन् चितळेंच्या बाकरवडीवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp