दौंड: दौंड तालुक्यातील वाखरी (केडगाव चौफुला ) येथील न्यू अंबिका कला केंद्रात 21 जुलैच्या रात्री साडेदहा अकराच्या सुमारास लावणीची गाणी वाजवायची का डीजे ची गाणी वाजवायची ह्यावरून वाद झाला आणि या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती.पण हे प्रकरण दाबण्यासाठी अतोनात प्रयत्न होऊनही शेवटी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला व या गोळीबार प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आमदाराचा भाऊ पोलिसांनी अटक केला असून चंद्रकांत मारणे हा मात्र अद्याप सापडलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.

घटना संबंधित कला केंद्राच्या मालकांनी आणि कलाकारांनी लपवली होती. मात्र माध्यमांच्या जागृतीमुळे ही घटना बातमीच्या माध्यमातून उघडकीस आली. आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर मात्र प्रशासन वाऱ्यासारखे हलले आणि न्यू अंबिका कला केंद्रात जाऊन सखोल चौकशी केली असता ह्याच केंद्रात ही घटना घडल्याचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी या कला केंद्रातील व्यवस्थापकांना बोलते केले.
21 जुलै रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अंबिका कला केंद्र येथे रेणुका दुर्गा रुईकर यांची पार्टी सुरू होती, ज्यामध्ये पाच महिला उपस्थित होत्या. साधारण 11.15 वाजण्याच्या सुमारास मी गेटवर असताना आमचा कामगार युवराज चंदन धावत आला आणि सांगितले की, अंबिका जाधव हिला चक्कर येऊन ती खाली पडली आहे. मी त्वरित त्या ठिकाणी गेलो असता ती पडलेली आढळली, तिला लगेच दवाखान्यात पाठवले.
त्यानंतर चौकशी केली असता मला समजले की, आरोपी बाळासाहेब मांडेकर याने नाचताना अचानक बंदूक काढून हवेत गोळीबार केला. गोळी भिंती व छतावर आदळली. त्यामुळे आरोपी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम हे चौघे घाबरून गाडीतून निघून गेले. त्यानंतर मी सदर ठिकाणी पाहणी केली असता भिंत व छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसले आणि फरशीवर गोळीचा चपटा झालेला तुकडा सापडला, जो मी ताब्यात घेतला. अशी फिर्याद बाबासाहेब राजश्री अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली







