Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: नवे पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांना ‘सिंघम स्टाईल’ काम करावे लागणार, आव्हानांचा डोंगर आ वासून उभा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 2 November 2023, 19:17
dashrath patil New police in charge of loni kalbhor police station should take lot of efforts

लोणी काळभोर (पुणे): पुण्याच्या पुर्व भागात सर्वात संवेदनशील पोलिस स्टेशन असा लौकिक असणाऱ्या लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षत दत्तात्रेय चव्हाण छत्तीस वर्षाच्या पोलिस खात्यातील सेवेनंतर मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचा पदभार वरीष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी नुकताच स्विकारला आहे.

दशरथ पाटील यांच्या समोर स्थानिक स्वयंमघोषित राजकीय नेते व पत्रकार यांचा पोलिस ठाण्यातील वावर कमी करणे, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्था कायम राखणे यासह गुन्हे अन्वेषण वाढविणे, असामाजिक तत्वांवर लगाम लावणे, जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन न होऊ देणे, पोलिस ठाण्याच्या नवीन जागेसाठी पाठपुरावा करणे या सर्व बाबींचे मोठे आव्हान असणार आहे. सोबतच सायबर क्राईम, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फळकुट किरकोळ दुकानदारांकडून खंडणी वसुली यासह स्ट्रीट क्राईमकडेही पाटील यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

दरम्यान, मागील पंधरा वर्षाच्या काळात सिंघम पोलीस आधिकारी म्हणून नावलौकिक कमावलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांच्या नंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बरेच आधिकारी आले व गेले. परंतु, आपल्या कामाच्या पद्धतीचा न मिटणारा ठसा जो सुहास गरुड यांनी उमटवला, तसा ठसा उमटवण्याची कामगिरी करणे नंतरच्या दहा वर्षांतील एकाही आधिकार्‍याला जमले नाही. नुकतेच, सेवानिवृत्त झालेले दत्तात्रेय चव्हाण यांच्या काळात नको त्या व्यक्तींचा वावर पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाढला होता. नुतन वरीष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील आपल्या कामगिरीने सुहास गरुड यांच्या “सिंघम पाॅलीसी” ची परंपरा पुढे चालवणार की दत्तात्रेय चव्हाण यांच्या काळातील चमको नेते व स्थानिक स्वयंम घोषित राजकीय नेते यांच्या समवेतच्या मळलेल्या पायवाटेवरुनच चालणे पसंत करणार, याकडे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नागरिकांचे लक्ष असणार आहे.

 

हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड २०१० – २०१३ या कालावधीत “सज्जनांचा पुरस्कार, दूर्जनांवर कायदेशीर वार” ही त्यांच्या कामकाजाची पद्धत होती. कामाच्या या पद्धतीमुळे ते सर्वसामान्य स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले होते. त्यांची ती लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे त्यांची २०१३ मध्ये बदली झाल्यानंतर येथे आलेल्या प्रत्येक पोलीस निरीक्षकाच्या कामगिरीची तुलना सुहास गरुड यांच्या कामगिरीशी केली जाते. सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या या तुलनेत नंतर आलेला प्रत्येक आधिकारी अनुत्तीर्ण झाला आहे. नव्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेणाऱ्या पोलीस निरीक्षकांच्या कारभाराची तुलना ही सर्वसामान्य नागरिक सुहास गरुड यांच्या कारभाराशी करणार हे अपरिहार्य आहे.

लोणी काळभोर व त्या लगतच्या गावात नागरीकरणाचा वेग वाढल्याने येथील जमिनींचे बाजार भाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त पटीने वाढले आहेत. परिणामी तालुक्यात सर्वत्र पैशाचा धूर निघत आहे. या पैशातून आलेली तकलादू श्रीमंती तरूणांना विचार करायला वेळच मिळू देत नाही. महागडे मोबाइल, दुचाकी, चारचाकी वाहने, सोन्याचे दागिने, ब्रॅण्डेड कपडे, सेंट, परफ्यूमस, डिओडरंट, शाॅपींग माॅलमध्ये खरेदी, हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहणे, मित्रांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करणे, केक कापणे, वेगवेगळ्या प्रकारची दाढी वाढवणे, सोशल मिडियात वेगवेगळे फोटो टाकणे, डिजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणे, व्यसनांचे सर्व प्रकार वारंवार करणे या पलीकडे आजची तरुणाई जातच नाही. हे असे वागणे म्हणजेच जीवन आहे किंवा या शिवाय जीवन असूच शकत नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने तरुणांचे आयुष्य खराब होत आहे. या तरुणाईला वठणीवर आणण्याच्या कामाला नवीन पोलीस निरीक्षकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह परीसरात मागील काही दिवसांपासून लग्नाच्या वरातीत तलवारी हातात घेऊन नाचणे, तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे, कापलेला केक न खाता एकमेकांच्या तोंडाला लावणे, वाढदिवस साजरा करताना अंडी एकमेकांच्या अंगावर फोडणे असले विचित्र प्रकार बहुतेक सर्वच ठिकाणी सुरू आहेत. एंकदरीत पहाता लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी एका खंबीर, खमक्या बाजीराव सिंघमची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील बेभान झालेल्या तरुणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे भवितव्य गंभीर आहे.

वाढदिवस अधिकाऱ्याचा की भावी नेत्याचा…

लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण नुकतेच सेवानिवृत्त झाले. पण त्यांनी सेवानिवृत्तीच्या अगोदर साजरा केलेला वाढदिवस व सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पोलिस खात्याच्या कार्यपध्दतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करुन गेला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढदिवस व सेवानिवृत्तीचे एखाद्या नेत्याप्रमाने लागलेले फ्लेक्स पोलिसांची प्रतिमा मलीन करुन गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. राजकीय नेत्याप्रमाणे, अनेकांनी आयजीच्या जिवावर बायजी होत स्वतःला मिरवुन घेतल्याची चर्चा पोलिस दल व सर्वसामान्य जनतेत सुरु आहे. अधिकारी स्वतःच्या जाहिरातीत गुंतल्याने, त्यांच्या हाताखालील पोलिसांनी लोणी काळभोरमध्ये मागील दोन ते अडीच महिन्यांच्या काळात मोठा धुडगुस घातल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे पोलिसांनी मलीन झालेली प्रतिमाही सावरण्याचे काम दशरथ पाटील यांना करावे लागणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post
drought declared baramati purandar tahsil pune

Pune news: बारामती, पुरंदर गंभीर दुष्काळग्रस्त; तर दौंड, इंदापूर, शिरुर निम दुष्काळी तालुके जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.