Thursday, March 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: पोटदुखीमुळे दवाखान्यात गेली अन् सत्य समोर आलं; नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत ओलांडल्या सर्व मर्यादा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 March 2026, 15:00

Crime News: अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव परिसरात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने आपल्याच शाळेतील आठवीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर हा सर्व घृणास्पद प्रकार उघड झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलगी एका माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. घरच्या ओढग्रस्त परिस्थितीमुळे ती नेहमी मानसिक दडपणाखाली असायची. तिचे वडील कामासाठी बाहेर असायचे, तर आई आणि भाऊ आपापल्या कामात व्यस्त असायचे. मुलीच्या याच एकाकीपणाचा आणि मानसिक अवस्थेचा फायदा आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले याने घेतला. आरोपीचे वय २३ वर्ष असून तो संगमनेर येथील रहिवासी आहे. मुलगी सातवीत असल्यापासूनच त्याने तिच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली होती. तिला भावनिक आधार देण्याचे नाटक करून त्याने तिच्या आईच्या मोबाईलवर प्रेमाचे संदेश पाठवून तिचा विश्वास संपादन केला.

डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या प्रदीर्घ काळात हा अत्याचाराचा सिलसिला सुरू होता. जेव्हा मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा आरोपी तिच्या घरी जाऊन तिच्यावर जबरदस्ती करायचा. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता, मात्र कोणालाही याची पुसटशी शंका आली नाही. काही दिवसांपूर्वी मुलीला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला, म्हणून तिला पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले आणि हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी अमोल भोसले याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला झिरो क्रमांकाने नोंदवलेला हा गुन्हा पुढील कारवाईसाठी घारगाव पोलिसांकडे सोपवण्यात आला. घारगाव पोलिसांनी त्वरित तपास चक्रे फिरवून नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात संतापाची लाट पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News: रोहित पवारांनी केलेले आरोप खरे? CID कडून ‘व्हीएसआर’ कंपनीच्या मालकाची कसून चौकशी

Thursday, 5 March 2026, 13:25

Pune Crime : पुण्यात सहा घरफोड्यांचा उलगडा; ‘सनी गँग’चे दोन आरोपी अटकेत, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 5 March 2026, 13:12

Pune News: 10 हजार कोटींची गुंतवणूक आणि हजारो नोकऱ्या; पुणेकरांसाठी फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Thursday, 5 March 2026, 12:54

Baramati Accident: भीषण अपघात! बारामतीत पतीसमोरच पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ

Thursday, 5 March 2026, 12:53
High Court grants bail to accused in POCSO case in Loni Kalbhor...

Pune Crime : बारामती न्यायालयाचा दणका! वहिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दिराला 10 वर्षांची कोठडी

Thursday, 5 March 2026, 12:24

Pune News: पुणे विमानतळावर 74.50 लाखांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त; एअर इंडियाच्या बँकॉक-पुणे फ्लाइटमध्ये कारवाई

Thursday, 5 March 2026, 11:56
Next Post

War Impact: युद्ध इराणमध्ये, महागाई भारतात! काय महागलं आणि काय स्वस्त झालं? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.