Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड परिसरात तरुणाईची पावले गुन्हेगारी जगताकडे वाढत असल्याने चिंता; भौतिक सुखामागे धावणा-या या तरुणाईसाठी प्रबोधन करणे गरजेचे – रमेश बापू कोंडे

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 2 August 2025, 17:51

विशाल भालेराव

खडकवासला: ऐशोरामी जीवन जगण्याच्या स्वप्नात असलेल्या तरुणाईची पावले दिवसेंदिवस गुन्हेगारी जगताकडे ओढली जात असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. आतापर्यंत हवेली पोलिसांनी विविध गुन्ह्यांत अटक केलेल्या गुन्हेगारांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही बालगुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे. शिक्षण व कामधंद्यांकडे दुर्लक्ष करुन ही तरुणाई गुन्हेगारी जगताकडे का वळत आहे? हे शोधून तरुणाईत प्रबोधन होणे गरजेचे वाटू लागले आहे.

गेल्या काही वर्षांत दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, रस्तालूट, घरफोड्या, खंडणी, मुलींची छेडछाड, अत्याचार, विनयभंग, दहशत पसरवणे या प्रकारच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. बाल गुन्हेगारीत चांगलीच वाढ झालेली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एकतरी कमी पडत आहे. मोठे गुन्हेगारांचे आकषर्ण ही मुले आमलात आणत असतील तर आशा गुंडावर प्रशासकीय यंत्रणेचा अंकुश आहे ? त्यामुळे गुन्हेगार व्हाईट कॉलरने खुलेआम प्रशासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून बाल गुन्हेगारांना घेऊन गुन्हे करीत आहेत.

त्यामुळे छोटा गुन्हा करणारा गुन्हेगार गुन्हेगारीचे एकावर एक टप्पे पार करीत समाजात स्वतःची दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात पोलीस प्रशासनाने अनेक गुन्ह्यांची उकल करीत अनेक गुन्हेगारांना जेरबंद केलेले आहे. यातील बहुतांश गुन्हेगार हे 18 ते 25 वयोगटातील आहेत. तर काही बालगुन्हेगार आहेत. मोठ्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना काही काळ बालसुधारगृहात ठेवून सोडून देण्यात येते तर छोट्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना अटक न करताच समज देऊन सोडून देण्यात येते. त्यामुळेच या बाल गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळते तर विविध गुन्ह्यातील आरोपी अटक होऊनही जामिनावर बाहेर येऊन साक्षी पुराव्याअभावी निर्दोष सुटून गुन्हेगारी जगतात आपले स्थान निर्माण करीत आहेत.

 

18 ते 25 वयोगटातील तरुणाई शिक्षण व कुटुंबाला कामधंद्यात मदत करण्यापेक्षा भौतिक सुखांना बळी पडत आहेत. महाविद्यालयात, माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे काही विद्यार्थीही छंदी फंदी व ऐशोरामी जीवनाचे स्वप्न पहात झटपट लखपती होण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आहेत. काबाडकष्ट करणारे आईवडील आपला पाल्य शिकतो आहे, या आशेने त्याचे कोडकौतुक करीत असतात. मात्र त्या पाल्याला भौतिक सुख खुणावत असल्याने तो गुन्हेगारीकडे वळला जातो.

पूर्वी शहरी भागात ही प्रवृती दिसून येत होती. मात्र आता तिची बिजे ग्रामिण भागातही खोलवर रुतली जात आहेत. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे झकपक राहाणीमान, पॉकेट मनी, महागड्या दुचाक्याचा वापर ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटू लागल्याने त्यांची पावले गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागातील पोहचलेला गुन्हेगार त्यांचा वापर करुन घेत स्वतःचे गुन्हेगारी विश्व मजबूत करताना दिसत आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला या गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्रास होऊनही निमूटपणे सहन करावा लागत आहे.

हल्ली पोलिसांनी गुन्ह्याची उकल करुन अटक केलेले बहुतांश गुन्हेगार हे 18 ते 25 वयोगटातील असल्याने ही चिंतेची बाब आहे. भविष्यातील देश घडवणारा तरुणच गुन्हेगारीकडे वळला जात असल्याने त्यावर गंभीरपणे मंथन होऊन भौतिक सुखामागे धावणार्‍या या तरुणाईसाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.

-रमेश बाप्पू कोंडे – जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा,शिवसेना शिंदे गट

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

बारामतीकरांना शिस्त लावण्यासाठी आता 'घोषणारिक्षा'; बारामती वाहतूक पोलिस आणि नगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp