Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अद्ययावत व्यावसायिक शिक्षणासाठी करमाळ्यात महाविद्यालय सुरू करणार : प्रा. रामदास झोळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 December 2023, 16:14

सागर घरत

करमाळा : व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी करमाळा शहरामध्ये येत्या दोन वर्षांमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू करणार आहे, असे प्रतिपादन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी केले.

दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूल, केत्तूर क्र. १ येथील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ, उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, प्रा. रामदास झोळ यांचे वडील मधुकर झोळ, दत्तकला शिक्षण संस्थेचे खजिनदार अनुरथ झोळ, राजेश्वर शैक्षणिक संस्थेचे संस्थापक लालासाहेब जगताप, सुधीर खाटमोडे, संभाजी खाटमोडे, एकनाथ शिंदे, राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले, आबासाहेब टापरे, श्रीकांत साखरे, गणेश जाधव, वाशिंबेचे माजी सरपंच भगवानराव डोंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ‘अविष्कार २०२३’ या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपली कला नृत्याच्या माध्यमातून सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

केत्तुरसारख्या ग्रामीण भागातही दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईच्या धर्तीवर चांगले शिक्षण मिळत आहे. प्राचार्य विजय मारकड व त्यांची टीम चांगली काम करत असून, दत्तकला शिक्षण संस्थेने करमाळा तालुक्यात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय सुरू करून करमाळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा मानस असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य विजय मारकड व त्यांचे सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूल स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

रात्रीच्या वेळी लिफ्ट दिली, त्यांनी कार चालकाला लुटलं; डोक्यात हातोडा मारून गाडी, मोबाईलसह कॅश घेऊन काढला पळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.