Sunday, March 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking: भिगवण प्रकरणाला नवे वळण; तरुणीची कोर्टात आईकडे जाण्याची इच्छा… 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 25 February 2026, 16:32

पुणे : भिगवण बाजारपेठेतून 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याच्या कथित घटनेने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तरुणीची इच्छा विचारली. त्यावेळी तिने आई आणि मामाकडे जाण्याची तयारी दर्शवली. या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

लग्न अवघ्या दोन दिवसांवर असताना आई व भावासोबत खरेदी करून घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आई आणि भावाकडून करण्यात आला होता. यावेळी आई आणि भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखत आंदोलन केले. भिगवण बंदची हाक देण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चाची तयारी सुरू होती.

मात्र, प्रकरणात त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात तिने “माझे अपहरण झालेले नाही. मी संबंधित तरुणासोबत माझ्या मर्जीने आले असून आमचे प्रेमसंबंध आहेत,” असा दावा केला होता. त्यानंतर दोघेही पोलिसांसमोर हजर झाले.

दरम्यान, तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी तिला बारामती न्यायालयात हजर करण्यात आले असता तिची आईही न्यायालय परिसरात उपस्थित होती. “माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या,” अशी आर्त विनंती आईने केली. मात्र त्या वेळी तरुणीने आईसोबत जाण्यास नकार दिल्याने तिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तरुणीची इच्छा विचारली. त्यावेळी तिने आई आणि मामाकडे जाण्याची तयारी दर्शवली. या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, सुरुवातीला अपहरणाचा आरोप आणि नंतर प्रेमसंबंधाचा दावा यामुळे परिसरात विविध चर्चा रंगल्या आहेत. न्यायालयाच्या पुढील आदेशाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pudina

Pudina : उन्हाळ्यातील ‘नॅचरल कूलिंग एजंट’! शरीरातील उष्णता अन् पित्ताचा त्रास पळवून लावेल हा छोटासा पुदिना; वाचा आरोग्यदायी फायदे

Sunday, 22 March 2026, 15:02
Pune

Pune : चाकण एमआयडीसीत दुचाकी चोरांचा सुळसुळाट! नेपाळी भामट्याला पुण्यातून बेड्या; 4 महागड्या गाड्यांसह सोन्याचे पदक जप्त

Sunday, 22 March 2026, 14:53
Pune Land Scam: 'Earthquake' in Pune's Revenue Department! 'Game over' for 152 senior officials; Reshuffle in seven posts and direct inquiry, suspension action

Pune Land Scam: पुण्याच्या महसूल विभागात ‘भूकंप’! 152 बड्या अधिकाऱ्यांचा ‘गेम ओव्हर’; सातबाऱ्यांमध्ये फेरफार अन् थेट चौकशी, निलंबनाची कारवाई

Sunday, 22 March 2026, 14:50

कोण आहेत ते 9 मंत्री? अशोक खरातच्या दरबारात नक्की काय चालायचं? संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Sunday, 22 March 2026, 14:41
Rupali Thombre: 'Ajitdada knew about this Bhondubaba case, he asked for Chakankar's resignation..." Rupali Thombre's statement; said "He is Chakankar's sugar daddy....

Rupali Thombre: ‘हे भोंदूबाबा प्रकरण अजितदादांना माहिती होतं, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा…” रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य; म्हणाल्या “तो चाकणकरांचा शुगर डॅडी….

Sunday, 22 March 2026, 14:24

नारेगावात गर्भलिंगनिदान रॅकेट उघड; दोन जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

Sunday, 22 March 2026, 14:23
Next Post

Crime News: धक्कादायक! आधी नशेत अत्याचार केला, मग शूटिंग करून तरुणीला रॅकेटमध्ये ओढलं; दोन बहिणींच्या क्रूरतेचा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.