Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तब्बल १०० शेतकऱ्यांच्या नावे उचलले दीड कोटींचे बोगस कर्ज, पुरंदरमधील कर्नलवाडी येथील शरद विजय सोसायटीतील धक्कादायक प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 27 May 2024, 12:42
bogus loan on farmers name in sharad vijay society karnalwadi purandar pune

नीरा (पुणे): पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील शरदविजय सोसायटीत मागील दोन-तीन वर्षांपासून लाखो रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा बँके आणि सहकार खात्याने मात्र तोंडावर बोट ठेवणे पसंत केले आहे. यामुळे सोसायटीच्या निर्ढावलेल्या सचिवाने आत्तापर्यंत सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्जे उचललेली आहेत. कर्जाची ही रक्कम जवळपास दीड कोटींच्या घरात आहे. यातील काही शेतकऱ्यांनी हातापाया पडून निम्मी रक्कम भरून घेतली आहे.

पुरंदर तालुक्यातील नावाजलेल्या शरद विजय सोसायटीत सत्तांतर झाल्यानंतर मंगेश सुभाष निगडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फोफावला. मे-२०२२ मध्ये ज्ञानदेव निगडे आणि मे-२०२३ मध्ये बाळासाहेब निगडे हे सोसायटीचे अध्यक्ष झाले. २०२२-२३ च्या लेखापरीक्षण अहवालामध्ये ३२ शेतकऱ्यांच्या नावावर पुणे जिल्हा बँकेच्या निरा शाखेतून बनावट पद्धतीने ४४ लाखांचे दुबार कर्ज काढल्याचा गैरव्यवहार उजेडात आला. शेतकऱ्यांनी आपले कर्ज “निल” केले, तरी त्यांच्या नावे बोगस कर्ज सचिवाने उचलल्याचे आणि पैसे लंपास केल्याचे समोर आले. तसेच संचालक मंडळानेही वार्षिक सभेत याविषयी चर्चा न करता विषय झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि संचालकांनी हातापाया पडून या व्यवहाराची रक्कम भरून घेतली आहे. सचिवाने ऑगस्ट अखेरपर्यंत २६ लाख ५७ हजार तर सप्टेंबर अखेरपर्यंत १७ लाख ४५ हजार रुपये भरले. त्यामुळे ३२ शेतकऱ्यांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला.

परंतु, मार्च २०२३ नंतरही सचिव आणि त्यांच्या संबंधित लोकांनी ही कार्यपद्धती तशीच सुरु ठेवली आहे. आता मार्च २०२४ पर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल येईल तेव्हा वास्तव समोर येणार आहे. शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा बँक, पोलीस आणि सहकार खाते यांच्याकडे आपल्या नावावर बोगस कर्ज काढले असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास ६८ असून, गैरव्यवहाराचा आकडा हा एक कोटीचा असल्याचा अंदाज आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यानंद बापटांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट;नेमका प्रकार काय?म्हणाले, “मी फक्त…….

Saturday, 5 September 2026, 12:53

खेळाडूंचं बोगस सर्टिफिकेट, थेट पोलीस भरतीत एन्ट्री!पुण्यात 19 उमेदवारांचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा समोर

Saturday, 5 September 2026, 12:32

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक? उपोषणाचा 8वा दिवस, उपचार घेण्यास पुन्हा नकार

Saturday, 5 September 2026, 12:16

थेऊर फाटा येथे रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची धडक; ‘झोमॅटो’ डिलिव्हरी बॉयचा उपचारादरम्यान मृत्यू, अज्ञात ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 5 September 2026, 11:59

हिंजवडीच्या समस्यांवर बोलणं पडलं महागात? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी खबरदारी म्हणून IT अभियंत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Saturday, 5 September 2026, 11:50

दहीहंडीच्या उत्सवात काळाचा घाला, पुण्यात लोखंडी स्ट्रक्चर डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

Saturday, 5 September 2026, 11:28
Next Post
robbery-in-sortapwadi-village-uruli-kanchan-pune

Uruli Kanchan News : पोलीस अधिकाऱ्याच्या घरावरच चोरट्यांचा 'मोठा' डल्ला; पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp