Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : शिवाजीनगर-हिंजवडी या दरम्यान मेट्रोत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम ; ब्रेक दाबा, वीज मिळवा अन् मेट्रो पळवा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 26 August 2023, 19:14

पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी या २३ किलोमीटर अंतराच्या पुण्यातील दुसऱ्या मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. या दरम्यान मेट्रोत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम बसविण्यात येणार आहे. म्हणजे मेट्रोत ब्रेक दाबल्यानंतर वीजनिर्मिती होईल. तीच वीज मग मेट्रो धावायलाही वापरण्यात येणार आहे. नव्याने केल्या जाणाऱ्या सर्व मेट्रोंमध्ये आता हेच तंत्रज्ञान प्रामुख्याने वापरण्यात येत आहे. यातून ऊर्जाबचत होणार आहे.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर हे काम होत आहे. त्यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. मेट्रोच्या कामात सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ब्रेक दाबल्यानंतर त्यातून वीजनिर्मिती हा त्याचाच एक भाग आहे. ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम’ असे या यंत्रणेचे तांत्रिक नाव आहे.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही एक ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. मेट्रो ट्रेनच्या प्रक्रियेत जेव्हा ट्रेन ब्रेक लावते तेव्हा गतीज ऊर्जा सोडली जाते आणि ती मोटर्समधील विद्युत्प्रवाहात साठवली जाते. मेट्रो ट्रेनच्या बॅटरीजमध्ये वितरित होणारी अशी वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणूनदेखील कार्य करते. ही एक ऊर्जा-बचत प्रक्रिया असते; कारण पुन्हा निर्माण केलेली विद्युतऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते. नेहमीच्या ऊर्जावापरात त्यामुळे लक्षणीय बचत होते.

 

दरम्यान, शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या प्रत्येक बोगीत इलेक्ट्रिक ब्रेकिंग तसेच इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग अशा दोन यंत्रणा असणार आहेत. ट्रेनच्या मोटर्स ब्रेक कम पॉवर जनरेटर म्हणून काम करतील. नेहमीच्या वेगाने ट्रेनला इलेक्ट्रिक ब्रेकिंग लागू होईल; मात्र ट्रेनचा वेग ताशी १० कि.मी. किंवा त्याहून कमी होईल त्यावेळी इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग सिस्टम सुरू होईल.

मेट्रोच्या प्रत्येक बोगीत दोन स्वतंत्र इलेक्ट्रो-न्यूमॅटिक सर्किट्स

मेट्रोच्या प्रत्येक बोगीत असे दोन स्वतंत्र इलेक्ट्रो-न्यूमॅटिक सर्किट्स असतील. एक सर्व्हिस सर्किट आणि एक सहायक सर्किट. मेट्रो बॉडीखाली बसवलेले इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूल (EPM) एकाच वेळी काम करील. इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूलमध्ये संपूर्ण वायवीय ब्रेक सक्रियकरण उपकरणे असतील, ज्यामध्ये वायवीय दाबनिर्मिती, दाबनियमन आणि इलेक्ट्रिक ब्रेक नियंत्रण यांचा समावेश असेल. या सर्व घटकांचे स्वतंत्र ब्रेक कंट्रोल युनिटद्वारे इलेक्ट्रो-न्युमॅटिकली नियंत्रण आणि निरीक्षण केले जाईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

महाराष्ट्रात अनेक योजना असून त्या गरिबांपर्यंत पोहोचत नाहीत ; सुरेखा पुणेकर यांची खंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.