जीवन सोनवणे
भोर, (पुणे) : राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२२- २३ ची सर्वसाधारण वार्षिक सभा २६ सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
हि सभा माजीमंत्री अनंतराव थोपटे यांच्या प्रमुख उपस्थित व कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सभेपुढे ९ विषय ठेवले जाणार असून अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार होणार आहे.
दरम्यान, ऊस उत्पादक आणि कारखान्याच्या सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक सुनील महिंद्र यांनी केले आहे.