Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigawan : अनधिकृत विजेच्या वायरमुळे तरुणाचा मृत्यू; भिगवण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Saturday, 14 March 2026, 9:00
Bhigawan

photo- ppn

Bhigawan : विजेच्या खांबावर अनधिकृतरीत्या वायर टाकून ढाब्याच्या बोर्डाचे काम करत असताना एका तरुणाला वायर हलविण्यास सांगितल्यामुळे विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रोहित मच्छिंद्र कसबे (वय 28, धंदा चालक, रा. मदनवाडी-चौफुला, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष उर्फ मुकेश पवार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) व बळीराजा ढाब्याचे मालक सागर खाडे (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मौजे भादलवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत बळीराजा ढाब्यासमोर ही घटना घडली. त्या वेळी आरोपी ढाब्याच्या नावाचा लोखंडी बोर्ड बसविण्याचे काम करत होते. यासाठी त्यांनी महावितरणच्या विजेच्या खांबावर अनधिकृतरीत्या इलेक्ट्रिक वायर टाकली होती.

त्यावेळी फिर्यादीचा भाऊ सौरभ मच्छिंद्र कसबे (वय 26, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) तेथे उपस्थित होता. आरोपींनी त्याला वायर हलवून विजेचा आकडा खाली पाडण्यास सांगितले. सौरभ यांनी मला असे काम जमत नाही असे सांगितले असतानाही आरोपींनी फक्त वायर धरून हलवली तर आकडा खाली पडेल असे सांगून तसे करण्यास प्रवृत्त केले.

त्यावर सौरभ कसबे यांनी उजव्या हाताने वायर पकडून ती हलवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना, छातीला व पाठीला गंभीर भाजल्या गेल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 5 मार्च रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, उपचारासाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाबाबत पैसे मागितले असता आरोपींनी फिर्यादी रोहित कसबे व त्यांची बहीण आरती यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच “तुम्हाला काय तक्रार द्यायची ते द्या” असे म्हणत आरती हिला धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, विजेच्या खांबावर अनधिकृतरीत्या वायर टाकल्याचा प्रकार गंभीर मानला जात असून याबाबत महावितरणकडूनही स्वतंत्र कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारगड करीत आहेत.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post
Navale Bridge Accident

Navale Bridge Accident : नवले ब्रिजवर पुन्हा रक्ताचा सडा! भरधाव ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; 5 गाड्यांचा चक्काचूर.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.