Bhigawan : ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूजा गोरख पोंदकुले यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच ज्ञानेश्वरी देविदास कुंभार यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. दि. 23 रोजी उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. पोंदकुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रतिभा देवकाते यांनी काम पाहिले, तर सरपंच मनीषा संदीप गवळी अध्यक्षस्थानी होत्या.

सभेला सर्व 8 पैकी 8 सदस्य उपस्थित होते. सर्वानुमते निवडीचे स्वागत करत सदस्यांनी अभिनंदन केले.
निवडीनंतर गावातील अपंग नागरिकांना टेबल फॅनचे वाटप करण्यात आले. तसेच योगेश्वरी माता मंदिर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना उपसरपंच पूजा पोंदकुले यांनी गावाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.








