Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत नात्याला काळिमा फासणारी घटना ! मावसभावनेच ‘त्या’ क्षणांचे व्हीडीओ काढून केले व्हायरल

गणेश सूळby गणेश सूळ
Monday, 1 January 2024, 18:33

बारामती : बारामती जवळच्या एका गावात बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या अल्पवयीन बहिणीचे तिच्या मावस भावानेच कपडे बदलतानाचे व्हिडीओ काढले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने ते व्हायरल करत मावस बहिणीला ब्लॅकमेल केले. अडचणीत सापडलेल्या या मुलीसाठी तिची मैत्रिणी आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला. तिच्या मावस भावावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नेमक काय घडलं?
ही पीडित अल्पवयीन मुलगी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. ती शिक्षणासाठीच बारामतीजवळच्या गावात राहणाऱ्या तिच्या मावशीकडे आली होती. ती घरामध्ये कपडे बदलत असताना आणि अंघोळ करत असताना तिचे व्हिडीओ त्याने काढले. त्या आधारे त्याने अनोळखी क्रमांकावरून मावस बहिणीशी संपर्क साधत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या मुलीने मैत्रिणींला ही बाब सांगितली. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे यांची मदत घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना सर्व हकीकत सांगण्यात मदत मागण्यात आली.

पोलिसांनी छडा लावला
मुलीला मेसेज येत असलेल्या मोबाइलचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न सुरवातीला झाला. परंतु त्याने मोबाईल स्विच ऑफ ठेवला. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावण्याचे नियोजन केले. ते देखील जमले नाही. अखेर या मुलीने धाडसाने त्याच्याशी चॅटींग सुरु ठेवले. त्याने तिच्याकडे एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार पुढील प्लॅन पोलिसांच्या मदतीने आखण्यात आला. शहरातील एका विद्यालयाजवळ भेट ठरली. परंतु त्याने ती तेथे आल्यानंतर पुढे पाटस रस्त्यावर भेटायला ये असे सांगितले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अक्षय सिताप, दशरथ इंगुले आदींनी सापळा रचत त्याला पकडले. त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला. अखेर तो हाती आल्यावर तो या पीडितेचा मावसभाऊच असल्याचे समोर आले. दरम्यान या मुलीच्या कुटुंबाची स्थिती गरीबीची आहे. त्याचा फायदा घेत तिने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करू नये, यासाठी दबावाला सुरुवात झाली. परंतु पोलिसांनी स्वतःहून पुढे येत फिर्याद दाखल करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39
Next Post

पुणे जिल्ह्यातील ५ विद्यार्थ्यांची 'दीनदयाळ स्पर्श योजना' शिष्यवृत्तीसाठी निवड; डाक विभागाकडून परीक्षेचे आयोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp