पुणे: पुणे शहर आणि परिसरात (Andekar Gang) सध्या त गँगवॉरची सर्रास सुरू (Pune Gangwar) असून त्यात आंदेकर टोळीचं नाव वारंवार पुढे येत आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Pune Crime) यांच्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी या गटाने आक्रमक हालचाली सुरू केल्या. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी दोन खून केल्याची नोंद पोलिसांकडे असून त्यात आयुष कोमकर आणि गणेश काळे यांचा समावेश आहे. आयुष कोमकर हा टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा नातू असून अंतर्गत मतभेदातून त्याची हत्या करण्यात आली होती. (Breaking News)

हेही वाचा: हडपसरच्या ‘टिपू पठाण’ टोळीवर ‘मकोका’! खून, खंडणीसह २५ गंभीर गुन्हे; पोलिस आयुक्तांचे थेट आदेश
वनराज आंदेकर खून प्रकरणातील संशयित समीर काळेच्या भावाचा काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनांमुळे आंदेकर गटाने शहरात आणि ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीचा कणा मानल्या जाणाऱ्या बंडू आंदेकरच्या तिन्ही मुलांना सार्वजनिकपणे उघड्यावर आणत मोहीम राबवली. आयुष कोमकर हत्येचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या कृष्णा आंदेकरसह अभिषेक आणि शिवराज आंदेकर या तिन्ही भावांची पोलिसांनी धिंड काढली. गणेश पेठ आणि नाना पेठ या टोळीच्या प्रभावक्षेत्रात ही मोहीम राबवून स्थानिकांमध्ये निर्माण झालेला दहशतवाद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरझडतीदरम्यान आरोपींना परिसरात नेऊन पोलिसांनी त्यांची उघडपणे धिंड काढली.
दरम्यान, पुणे पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात अलीकडेच कारवाईचा जोर वाढवला आहे. शहरातील विविध भागांत झालेल्या छापेमारीदरम्यान गेल्या तीन आठवड्यांत 11 देशी आणि विदेशी बनावटीच्या बंदुका तसेच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून कठोर पावले उचलत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.







