Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ajit pawar death : इतक्या मोठ्या नेत्याचा अंत असा अचानक व्हावा, हे मनाला पटत नाही, घात की अपघात? – रुपाली पाटील ठोंबरे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 February 2026, 12:28
ajit pawar death

photo- social media

ajit pawar death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली असतानाच, या घटनेभोवती आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मृत्यूच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी ऐरणीवर आली आहे.

 

रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये अजित पवार यांच्या अचानक जाण्याने आपण मानसिकदृष्ट्या हादरल्याचं नमूद केलं आहे. “कसे झाले, का झाले, काहीच कळत नाही. इतक्या मोठ्या नेत्याचा अंत असा अचानक व्हावा, हे मनाला पटत नाही,” असं त्या म्हणतात. विशेषतः प्रवासादरम्यान घडलेल्या घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. नियोजित वेळेत असलेल्या फ्लाइटसाठी दोन्ही पायलट एकाचवेळी उशिरा पोहोचणे, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरच्या सुरक्षा प्रक्रियेबाबतची माहिती सार्वजनिक न होणे या सगळ्यांमुळे ‘घात की अपघात?’ असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण घटनेची सखोल, पारदर्शक चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. (ajit pawar death)

या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आणखी एक विषय चर्चेत आला. सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत पार पडलेला शपथविधी. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ का घेण्यात आली, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भाजप नेतृत्वाला संभाव्य राजकीय पेच टाळायचा होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू असताना, अजित पवार यांच्या निधनानंतर सत्ताकेंद्र शरद पवारांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे तातडीने पक्षाची सूत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं सांगितलं जातं.

राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांनी या शपथविधीवर टीका केली असली, तरी आमदारांमधील अस्वस्थता, अफवा आणि नेतृत्वाबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य होता, असं पक्षातील निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.

एकीकडे अजित पवार यांच्या मृत्यूभोवती चौकशीची मागणी, तर दुसरीकडे सत्तेतील तातडीचे निर्णय या दोन्ही घडामोडी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा; सेवा रस्ता आणि मुख्य मार्गावरच रांगा, पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

Saturday, 2 May 2026, 10:34
Next Post

बनावट कागदपत्रे आणि खोटा मालक; पुण्यात NRI कुटुंबाची जमीन कशी हडपली? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.