मुंढवा: अवैध दारू धंद्याविरुद्ध कारवाई करताना, मुंढवा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून ११,००० रुपयांची ११० लिटर अवैध दारू जप्त केली आहे. शिंदे वस्ती घोरपडी परिसरात अवैध दारू व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकून मधुकर मोतीराम सरोदे आणि सुरेश रत्न गुमाणे दोघांना अटक केली आहे. सुरेखा गुमाने या आरोपीकडून ५ हजार रुपये किंमतीची ५० लीटर हातभट्टी ताब्यात घेऊन नष्ट केली, तसेच पथकाने मधुकरचा शोध घेऊन त्याच्याकडून ६ हजार रुपयांची ६० लीटर हातभट्टी जप्त केली आहे.

आरोपींकडून पोलिसांनी ११,००० रुपयांची ११० लिटर अवैध दारू जप्त असून परिसरात ही दारू बेकायदेशीरपणे विकली जात होती. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे या भागातील अवैध दारू धंद्याला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, अवैध दारू धंद्याविरुद्ध कारवाई सुरूच राहील आणि या धंद्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, परिसरात असलेल्या कोणत्याही अवैध दारू धंद्याविषयी माहिती द्यावी.








