Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंचरजवळ शेत मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी; एक महिला ठार, ११ जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 November 2024, 17:05

मंचर : पुणे-नाशिक स्त्यावर मंचरजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचालकांचे नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यावर उलटला. या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली, तर तीन लहान मुलांसह ११ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १०) सकाळी सहा वाजता मंचरजवळील निघोटवाडी बायपास येथे घडली आहे. सुमन महादू जाधव (वय-८०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

भामाबाई वाळू कडाळे (वय ४०), मंदा संदीप गांगट (वय २२), कार्तिक सुरेश मधे (वय ३.५ वर्ष), आराध्या सुरेश मधे (वय ४ वर्ष), विठ्ठल सोमा दुधवडे (वय ५०), मनीषा शिवाजी भुतांबरे (वय ४०), सरू पांडू जाधव (वय ४४), शांताराम आनंद दुधवडे (वय ४०), यमुनाबाई शांताराम दुधवडे (वय ३५), हिरावाई येसू काळे (वय ४५), कृष्णा संदीप जाधव (वय ३ वर्ष) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मंचर पोलिसांनी पिकअपचालक बबन नामदेव मधे (वय-४५) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपचालक बबन मधे हा नारायणगावजवळील वळणवाडी येथून चाकण-सावर्ली येथे भात कापणीसाठी पिकअपमधून (एमएच १४ एझेड ०९५१) मजुरांना घेऊन जात होता. निघोटवाडी बायपासजवळ समोरून आलेल्या पिकअपला हुलकावणी दिल्याने चालक बबन मधे यांचे नियंत्रण सुटून मंचरजवळील निघोटवाडी बायपास येथे मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी झाला.

या अपघातात एका मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर तीन लहान मुलांसह ११ जण जखमी झाले आहेत. पिकअपचालक बवन नामदेव मधे याला मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस कर्मचारी विलास हगवणे यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला आहे. जखमींमध्ये सर्व जण ठाकर समाजातील गरीब कुटुंबातील मजूर असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदा विभागाचे 15 टक्के कपातीचे आदेश; 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 17:02

सोरतापवाडीत ‘ए.के. वाईन्स’ मागे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, उरुळी कांचन पोलिसांनी 4 जणांना रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 16:59

तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ ची पहिली फायनलिस्ट! पण नॉमिनेशनच्या चक्रव्यूहात कोणाचा पत्ता कट होणार? घरात मोठा राडा”

Friday, 10 April 2026, 16:42

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! म्हसोबाचीवाडी आणि अकोल्यात घरफोडी; दोन्ही घरफोडीत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Friday, 10 April 2026, 16:17

बाबा हा फ्रॉड कॉल आहे! पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई-बाप ‘डिजिटल अटके’त; शेवटी तन्मयने वापरलं डोकं आणि…

Friday, 10 April 2026, 16:08

आकर्षक दिसणारा आंबा नेऊ शकतो थेट हॉस्पिटलमध्ये; खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा

Friday, 10 April 2026, 16:06
Next Post

दौंड तालुक्याच्या विकासासाठी राहुल कुल यांच्याबरोबर : आनंद थोरात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.