Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली; दहा पर्यटक जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 11:18

पुणे : सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून अपघात झाला. यामध्ये १० ते १२ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सिंहगड घाट रस्त्यावरुन रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पर्यटकांना घेऊन जीप पायथ्याकडे निघाली होती. वळणावर जीप अचानक उलटली. तेथून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी जीपमधील पर्यटकांना बाहेर काढले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, सिंहगड घाट रस्त्यावर अनेकदा अपघात घडतात. येथील वळण धोकादायक ठरत आहे. पर्यटकांना पायथ्यावरून गडापर्यंत आणि पुन्हा खाली नेण्यासाठी जीप वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, हीच वाहतूक जीवघेणी ठरत आहे. रविवारी संध्याकाळी सिंहगड घाट रस्त्यावरील अकरा हजार वळणाजवळ उलटली. यावेळी जीपमध्ये बारा ते पंधरा पर्यटक होते. जीप उलटून बरेच जण खाली कोसळले आणि जखमी झाले. प्रसंगावधान राखत अन्य वाहनचालकांनी तातडीने वाहने थांबवून अपघातग्रस्त जीपमधील पर्यटकांना बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळाल्यावर वन विभागाचे अधिकारी तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, रविवारी सकाळी सिंहगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांची सहल आली होती. विद्यार्थ्यांना गडावर घेऊन आलेल्या जीपचा गाडीतळाजवळील तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाला. अपघातात एक विद्यार्थी जखमी झाला, अशी माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी दिवसभरात दोन अपघात झाले. या दुर्घटनेमुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन व नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

पर्यटकांना पायथ्यावरुन गडापर्यंत नेण्यासाठी जीपचा वापर करण्यात येतो. प्रवासी वाहतूक करणारी वाहने सुस्थितीत नसतात. सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन कारवाई करण्यासाठी वनविभागाने प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पत्र दिले होते. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आली नाही. धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, असे पत्र पुन्हा आरटीओकडे देण्यात येणार असल्याचे वनरक्षक बळीराम वायकर यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

पोलिस पथकावर गोळीबार करुन ठोकली धूम; फरार गुन्हेगार अखेर गजाआड; पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.