Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार यांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची धमकी? रोहित पवारांचा गंभीर आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 19 February 2024, 8:40
Deputy CM Ajit Pawar-Led NCP Faction Moves Bombay High Court Against Speaker's Refusal To Disqualify Sharad Pawar-Led NCP's MLAs

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरुन काढण्याचा आणि दादागिरी करण्याचा प्रकार केला जात असल्याच दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात जास्त तीव्र होण्याचे शक्यता आहे. दोन्ही गटाकडून बारामती लोकसभेचा उमेदवार निश्चित झाला आहे. शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. असं असताना रोहित पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

“अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मीडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करतेय. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावं”, अशा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग…

— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 18, 2024

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Monday, 23 November 2026, 10:42

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Monday, 23 November 2026, 10:01

Pune News: ऊस तोडताना अचानक बिबट्याचा हल्ला! मजुराने हातातील कोयत्याने दिली झुंज; थोडक्यात वाचले प्राण

Monday, 23 November 2026, 9:26

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भेंडी आणि गवारीच्या दरात वाढ; फ्लॉवर, मटारचे भाव घसरले, पाहा आजचे दर

Monday, 23 November 2026, 9:19

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Monday, 23 November 2026, 8:48

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38
Next Post

कोलेस्ट्रॉल कमी करायचयं? दररोज न चुकता ग्रीन टी पिल्याने होईल फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp