Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 November 2026, 10:42

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अतिरिक्त भार पडत आहे. मात्र, आता ही योजना बंद करणे किंवा लाभार्थी महिलांना बाजूला करणे सरकारला शक्य नसल्याचे विधान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते.

निवडणुकीपूर्वी या योजनेबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. मात्र, महायुती सरकारने ही योजना सुरू केली आणि आता मोठ्या संख्येने महिला तिच्या लाभार्थी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून दूर जाता येणार नाही, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले. योजनेचा खर्च आणि राज्याची आर्थिक स्थिती यांचा विचार करता सरकारसमोर आव्हान निर्माण झाले आहे. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने आर्थिक अडचण आणखी वाढू शकते. विशेषतः पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर झाल्यास रेल्वे किंवा विमानाच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्यासारखे पर्याय वापरावे लागू शकतात. अशा उपायांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासेल, असे मत झिरवाळ यांनी व्यक्त केले.

तरीही लाडकी बहीण योजना आणि दुष्काळ निवारणासाठी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली सरकार या परिस्थितीतून मार्ग काढेल, असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Monday, 23 November 2026, 10:42

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Monday, 23 November 2026, 10:01

Pune News: ऊस तोडताना अचानक बिबट्याचा हल्ला! मजुराने हातातील कोयत्याने दिली झुंज; थोडक्यात वाचले प्राण

Monday, 23 November 2026, 9:26

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भेंडी आणि गवारीच्या दरात वाढ; फ्लॉवर, मटारचे भाव घसरले, पाहा आजचे दर

Monday, 23 November 2026, 9:19

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Monday, 23 November 2026, 8:48

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp