Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 18:42

चाकण – यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याने व रस्ता उखडल्याने खराब झालेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून नुकतीच खेड तालुक्यातील लांबीतील दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही काळापासून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मोठे-मोठे खड्डे आणि अनेक ठिकाणी उखडलेला रस्ता यामुळे सातत्याने अपघात होत होते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १०१५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु त्यानंतर या रस्त्यावर एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यामुळे या एलिव्हेटेड रस्त्याचा डीपीआर तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास वेळ लागणार असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी तळेगाव चाकण शिक्रापूर व पुणे शिरूर या दोन्ही महामार्गांची तातडीची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दुरुस्तीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर केला होता.

खरं तर ऑक्टोबर महिन्याच्या मध्यासच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरुर या दोन्ही महामार्गावरील दुरुस्तीची कामे सुरू होणे अपेक्षित होते. परंतु यंदा पावसाळा दीर्घकाळ लांबल्याने दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पावसाळा थांबल्याचे दिसताच तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिलिंद बारभाई यांना दिले होते. त्यानुसार दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून मावळ तालुक्यातील रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर आज खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.

 

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ज्याठिकाणी रस्ता पूर्णतः खराब झाला आहे, त्याठिकाणी खड्डे बुजवून उखडलेल्या संपूर्ण भागाचे डांबरीकरण करण्यात येणार असून या दुरुस्तीसह देखभालीची जबाबदारीही सदर कंत्राटदारावरच असल्याने आगामी काळात रस्त्यांची वेळोवेळी दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे रस्ता सुस्थितीत होऊन वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

राज्यात गारठा वाढू लागला, निफाड  १२ अंशांवर,  गुलाबी थंडीची चाहूल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.