लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रेयस वलटे यांची युवासेनेच्या पूर्व हवेली तालुका युवा अधिकारीपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिरूर लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.
जिल्हा चिटणीस : गौरव काळभोर (हवेली तालुका पूर्व), संदीप ताजणे (जुन्नर तालुका), अॅड. योगेश शिंदे (आंबेगाव तालुका), योगेश नरवडे (आंबेगाव ३९ गावे) शरद बांदल (शिरूर तालुका).
तालुका युवा अधिकारी पुढीलप्रमाणे : श्रेयस वलटे (हवेली तालुका पूर्व) प्रताप कांचन (हवेली तालुका पश्चिम), तालुका समन्वयक पंकज जगताप (हवेली), विजय लोखंडे (शिरूर तालुका), शांताराम सावंत ( जुन्नर तालुका पूर्व), विकी पारखे (जुन्नर तालुका पश्चिम), विवेक पिंगळे (आंबेगाव तालुका), नितीन नरवडे (आंबेगाव ३९ गावे), मृण्मय काळे (खेड तालुका), कुणाल तापकीर (भोसरी तालुका),
दरम्यान, या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील.